ना.पंकजाताई यांनी केलेल्या विकास कामावरच मतदार धनंजय मुंडेंना तोंडघशी पाडतील-प्रा.टी.पी.मुंडे

0
739

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी मतदार संघच नव्हे तर संत महंतांची भुमी असलेल्या मराठवाड्याचा स्वाभिमान जपण्यासाठी व सत्तेच्या माध्यमातुन ना.पंकजाताई मुंडे यांनी केलेला विकास मतदार विसरले नाहीत. त्यांच्या या कामाची जाणीव ठेवुनच परळी मतदार संघातील मतदार राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना तोडघशी पाडतील व ना.पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करुन नवा इतिहास रचतील असा विश्वास भाजपाचे नेते प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी व्यक्त केला.

 

भाजपा-शिवसेना-रिपाई महायुतीच्या उमेदवार ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ भाजपा नेते प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी काल कन्हेरवाडी, इंजेगाव, कौठळी, बेलंबा, वागबेट, तळेगाव, पांगरी या गावांचा प्रचार दौरा केला. कन्हेरवाडी येथील रॅलीत खा.डॉ.प्रितमताई मुंडे याही सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला व पंकजाताईंच्या विकास कार्याचा आढावा मतदारांसमोर ठेवुन त्यांना पुन्हा एकदा आशिर्वाद देण्याचे आवाहन केले. गत पाच वर्षाच्या काळात झालेल्या विकास कामांचा आढावा घेत असतांना व त्यातुन शेतकरी-शेतमजुर व गोर गरीबांना झालेली फलप्राप्ती पाहता पंकजाताईंचा विजय निश्चित असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या खोटारडे पणाचा खरपुस समाचार घेतांना धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेेते पद मिळाल्यानंतरही मराठवाड्याच्या विकासासाठी तसेच परळी व बीड जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच परळी व बीड जिल्ह्याच्या विकासासाठी काय योगदान दिले याचे उत्तर जाहीरपणे द्यावे असे आव्हान करतांनाच स्वतःचा स्वार्थ साधण्याची सवय लागलेल्या धनंजय मुंडे यांच्याकडुन विकासाची काय आपेक्षा करणार ? असा सवालही भाजपा नेते प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी केला.
या प्रचार दौर्‍यात त्यांनी कन्हेरवाडी, इंजेगाव, कौठळी, बेलंबा, वागबेट, तळेगाव, पांगरी येथे प्रचार रॅली काढुन रेवली व टोकवाडी येथे मतदारांच्या व्यापक बैठका घेतल्या या दौर्‍यात रिपाईचे राज्य सचिव भास्कर नाना रोडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते मारोती मुंडे गुरुजी, माजी पं.स.सदस्य सुग्रीव मुंडे, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा (माऊली) फड, रमेश मुंडे, सुर्यकांत मुंडे, युवा नेते ज्ञानोबा मुंडे, कैलास फड, ताराचंद फड, मधुकर मुंडे, प्रभाकर गवळी, माऊली पाटील मुंडे, बाबासाहेब मुंडे, वैजनाथ मुंडे, जगन्नाथ मुंडे, जिल्हा उपाध्यक्ष भिमराव मुंडे, इंजेगावचचे सरपंच विनायक कराड, युवा नेते श्रीराम मुंडे, रामराव गित्ते, बंडु काळे, मार्केट कमेटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे, संजय मुंडे, राहुल कांदे, टोकवाडीचे तुकाराम मुंडे, सुंदर काळे, भारत मुंडे, मनीनाथ मुंडे, गणेश मुंडे, नागनाथ मुंडे, वागबेटचे कांताराम मुंडे, अशोक मुंडे, सोमनाथ गित्ते, गोविंद गित्ते, रवि गित्ते, रेवलीचे आश्रोबा कांदे, बंडु कांदे, शिवाजी मुंडे, मनोहर केदार, फुलचंद कांदे, लक्ष्मण केदार, श्रीरंग कांदे, सुमंत मुंडे, पप्पु कांदे, इंजेगावचे बाबुराव कराड, वाल्मीक लटपटे, दासुपंत कराड, सुभाष कराड, भास्कर कराड, भिमराव मुंडे, कौठळीचे प्रभाकर सुनावणे, सुधाकर मुसळे, आकाश मुसळे, रामप्रभु फड, सोमनाथ सोनवणे, काशिनाथ सोनवणे आदी सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.