मोर्शी मतदार संघात कृषिमंत्री विरोधात देवेंद्र भुयार यांची थेट लढत अमरावती जिल्हाचे लक्ष वरुड मोर्शी मतदार संघात अमरावती/वरुड मोर्शी

0
1430
Google search engine
Google search engine

मोर्शी मतदार संघात कृषिमंत्री विरोधात देवेंद्र भुयार यांची थेट लढत
अमरावती जिल्हाचे लक्ष वरुड मोर्शी मतदार संघात

अमरावती/वरुड मोर्शी

मोर्शी मतदार संघात देवेंद्र भुयार यांना वाढता प्रचार पाहून अनेकांचे धाबे दणाणले मोर्शी वरुड मतदार संघात महाआघाडी पक्षाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार देवेंद्र भुयार यांना उमेदवारी मिळाली त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस इत्यादी सर्व पक्षांनी देवेंद्र भुयार यांच्या प्रचारासाठी आणि त्यांच्या विजयासाठी लोकांना आवाहन करून मतदान करावयास सांगितले .
या सर्वांचा प्रतिसाद असा मिळाला की देवेंद्र भुयार यांचा मतदारसंघातील प्रचार जोरात सुरू आहे.देवेंद्र भुयार युवक वर्गातून समोर येऊन चक्क कृषिमंत्री यांच्या विरोधात निवडणूक लढवित असल्याने त्या मतदार संघातील ही निवडणूक अधिक रंगतदार ठरत आहे तर या मतदारसंघात देवेंद्र भुयार विरुद्ध कृषिमंत्री अशी लढाई दिसत असल्याने सर्व अमरावती जिल्ह्याचे लक्ष या मतदारसंघात लागले आहे देवेंद्र भुयार यांचा राजकीय प्रवास हा अत्यंत आव्हानात्मक राहिला आहे .