चांदूर रेल्वेत ईव्हीएम सिलींग,२६ ईव्हीएम वर चाचणी मतदान >< निवडणुक निरिक्षक राजीव शर्मा यांची भेट

0
560
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहजाद खान )

धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघासाठी चांदूर रेल्वे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षण हॉलमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्य सिलींगची दोन दिवसीय प्रक्रीया पार पडली. या दरम्यान २६ ईव्हीएम वर चाचणी मतदान घेऊन त्याची पडताळणी केल्या गेली. व कुठेही चुक आढळून आली नाही.

विधानसभा मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघात ४४७ ईव्हीएम मशीन संच व ५०३ व्हीव्हीपॅटचे सिलींग स्थानिक आयटीआयच्या हॉलमध्ये रविवारी व सोमवारी पार पडले. सिलींगनंतर सर्व मशीनपैकी कमीतकमी ५ टक्के म्हणजेच २६ मशीन स्वतंत्र बाहेर काढण्यात आले. या मशीनवर उमेदवारांच्या प्रतिनीधी समक्ष प्रत्येक मशीनवर १ हजार चाचणी मतदान करण्यात आले. व यानंतर ईव्हीएम मशीनवरील मतदान आणि व्हीव्हीपॅटमधील स्लीप याची पडताळणी केल्यानंतर मतदान बरोबर निघाले. त्यामुळे सर्व ईव्हीएम व्यवस्थित असल्याची खात्री करण्यात आली. या प्रक्रीयेसाठी सिलींगसाठी ४० टेबल व ईव्हीएमसाठी २६ टेबल लावण्यात आले होते. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी रणजित भोसले, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र इंगळे, कांबळे, भोसले यांची उपस्थिती होती. या प्रक्रीयेदरम्यान निवडणुक निरिक्षक राजीव शर्मा यांनी भेट देऊन पाहणी केली.