निवडणूक च्या धामधुमीत संत्रा ची कवडी मोल भावात खरेदी शेतकरी याची मोठ्या प्रमाणावर निराशा, बाजारभाव कमी असल्याचे सांगून होत आहे खरेदी

0
706
Google search engine
Google search engine

निवडणूक च्या धामधुमीत संत्रा ची कवडी मोल भावात खरेदी
शेतकरी याची मोठ्या प्रमाणावर निराशा, बाजारभाव कमी असल्याचे सांगून होत आहे खरेदी

चांदुर बाजार

चांदुर बाजार तसेच अचलपुर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर संत्रा फळबाग आहे.यावर्षी अधिक उष्णतेमुळे अपुरा पाणीपुरवठा अभावी वरुड-हिवरखेड या भागातील संत्रा फळबाग या काही प्रमाणात नष्ट झाल्या. तर चांदुर बाजार तालुक्यातील शेतकरी यांनी काटकसर आपल्या संत्रा फळभग कश्या तरी फुलवल्या. त्यानंतर पावसाने त्यांना योग्य वेंळी साथ दिली.मात्र एकसारखा पाऊस सुरू असल्याने काही भागात संत्राची गाळण देखील मोठ्या प्रमाणात झाली.

सध्या संपुर्ण महाराष्ट्र सह चांदुर बाजार तालुक्यात देखील निवडणूक वारे वाहत आहे.या सर्वामध्ये 4000 ते 4500 रुपये बाजार भाव असलेल्या संत्राची खरेदी की मार्केट पडले असल्याचे सांगून 2500 ते 3000 रुपये या भावाने खरेदी सुरू आहे.तर शेतकरी याचा संत्रा हा कवडीमोल भावात खरेदी केला जात आहे.या कडे राजकीय नेते याचे दुर्लक्ष होत तर आहे. पण चांदुर बाजार तालुक्यात अध्यपही एकही संत्रा प्रोसेसिग प्रकल्प नसल्याने याचा फटका हा संत्रा उत्पादक शेतकरी याना बसत आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त 500 ते 1000 रुपये इतका अधिक भाव मिळत आहे.खर्च पेक्षा उत्पन्न कमी असल्याने आज ना उद्या भाव वाढेल ह आस शेतकरी वर्गाला लागली आहे.

सध्या निवडणूक जवळ असून सर्व व्यापारी ,काही कार्यकर्ते, आणि विवीध पक्षचे पदाधिकारी या मध्ये व्यस्त असल्याने शेतकरी याच्या या कवडीमोल भावात खरेदी होणाऱ्या संत्रा कडे कोणाचे लक्ष जाणार हा विषय चर्चेत असला तर काही आर्थिक परिस्थिती सामोरे शेतकरी याना नाइलाजाने आपला संत्रा हा विकावा लागत आहे.

प्रतिक्रिया
*”मागील वर्षी 2000 रुपये भाव होता यावर्षी फक्त काही थोडीच वाढ झाली.मोठ्या बिकट परिस्थिती मध्ये संत्रा आणि झाड टिकवले आणि आता याभावत खरेदी होत असल्याने खर्च अधिक आणि नफा कमी असे चित्र दिसत आहे.*
1)प्रवीण निचत शेतकरी

*बाजार भाव 4500 ते 5000 रुपये आहे त्याला अनुसरून जर खरेदी 3500 ते 4000 झाली तर शेतकरी याना थोडा आर्थिक लाभ चागला होईल.*
2)सचिन देशमुख शेतकरी

बॉकमध्ये
*पाणी जास्त झाल्याने वाहतूक मध्ये संत्रा लवकर घराब होत आहे तर काही ठिकाणी संत्रावर काळे डाग असल्याने पेटीचा माल बनत नाही. या प्रकारचे कारणे ही व्यापारी कडून सांगितले जात आहे.

बॉक्समध्ये