जळगाव जामोद मतदार संघात दुहेरी की तिहेरी लढत ? एका मोठ्या ‘राष्ट्रीय’ पक्षाची प्रचारात पिछाडी ?

0
863
Google search engine
Google search engine

शेगांव/जळगांव (जामोद) :- विधानसभा निवडणूक रिंगणात उतरलेले सर्व पक्षीय उमेदवार आपापले पक्षाचे झेंडे व चिन्ह घेऊन सर्व जनते समोर जात आहेत. आपण जर आमच्यावर विश्वास दाखिवला, आपले आशीर्वाद रुपी ‘मत’ जर मला दिले तर आम्ही आपल्या सर्व समस्यांना तोंड देऊन आपले सर्व कामे प्रामाणिकपणे पूर्ण करू अशी आश्वासने देत आहेत तर काही उमेदवार, आपण केलेल्या कामाची, विकासाची पावती आणि त्यात सोबत भविष्यातील एजेंडा समोर ठेवित आहे आणि काही उमेदवार तर आपल्या मागील पिढीने केलेल्या कामाचे भरवश्यावर मते मागायला निघाले आहे तर कोणी आपण जनतेला काही देऊ शकतो या जिद्दिवर मतदार राजाला आपल्याला मतदान करावं असे आव्हान करत आहे.

अशीच काहीशी दशा जळगाव जामोद मतदार संघाची आहे की, ज्यात मोठ्या जोमाने उमेदवार कामाला लागली प्रचार गाड्या फिरत आहे आता पर्यंत तिरंगी लढत होण्याची चिन्ह दिसत होते, पण…

जळगाव जामोद मतदार संघातील सर्व शहरात व खेड्यापाड्यात आम्ही माहिती गोळा करायला गेलो असता निवडणूक आणि उमेदवार विषयी माहिती विचारली असता, काही भागात उमेदवारा विषयी चांगल्या कामाची तसेच विकासाची पावती मिळाली तर काही जागेवर उमेदवार विषयी विरोधाभास दिसून आला.

काही जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.संजय कुठे मागील ३ टर्म पासून आमदार आहेत आता काही दिवसा पूर्वीच त्यांनी मंत्रीपद सुध्दा भूषविले होते. त्याच्या कामाची पावती काही जागेवर जनता स्वतः समोर येऊन सांगत होती तर काही ठिकाणी शेतकरी वर्गात BJP विषयी रोष दिसून आला तर दुसऱ्या ठिकाणी जमिनीशी जोडलेले व्यक्ती म्हणून प्रचार सुरू आहे असे वंचितचे उमेदवार संगीतराव भोंगड यानां ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद दिसून येतो आहे आपल्या आतापर्यंतच्या प्रचारात त्यांनी चांगलीच भरारी घेतलेली पाहायला मिळत आहे परंतु शहरी भागात जोर कमी आहे तरीही मागील वंचित च्या उमेदवाराचे मिळालेली मतदान पाहता त्यावेळी च्या तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराशी प्रचारात टक्कर होतांना दिसते आहे अर्थातच काँग्रेसशी…तर तिसऱ्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महिला उमेदवर म्हणून डॉ. सौ.स्वाती वाकेकर यांना उमेदवारी दिली त्यांचं ही प्रचार पक्ष्याचे कार्यकर्ते करीत आहेत परंतु त्याच्या भागात जनतेची थोडी नाराजी दिसून येत आहे आणि सोबतचं शेगांव शहरामध्येही अत्यल्प प्रतिसाद मिळतना दिसत आहे.
मागील दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सतत तिसऱ्या क्रमांकावर दिसून आला त्यावेळी काँग्रेस उमेदवार हे शेगांव नगरीचे होते तरी सुध्दा ती स्थिती होती !
आता ती स्थिती कितपत बदलेल हे जनताच ठरवेल
एकंदरीत सर्व चित्र पाहता एकीकडे भाजपा तर दुसरी कडे वंचित , काँग्रेस असे चित्र दिसत आहे म्हणून ही निवडणूक दुहेरी की तिहेरी ? हा प्रश्नच…