माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांचे विकासाचे स्वप्न “बेटी पंकजा” पुर्ण करीत आहे

166
जाहिरात
Slider

पंकजाताईंच्या कामाचे कौतुक

थकलेल्या लोकांची गरजच काय?

परळी – माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांचे विकासाचे स्वप्न “बेटी पंकजा” पुर्ण करीत आहे असे प्रशस्तीपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजाताई मुंडे यांना देत त्या करीत असलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. मोदी यांच्या आज परळीत झालेल्या ऐतिहासिक सभेने ना. पंकजाताई मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. महायुतीचे सर्वच उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. तर मोदी यांच्या येण्याने जिल्ह्याच्या विकासाची नवी पहाट झाली असुन विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधी कमी पडू देणार नाहीत असा विश्वास पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीड जिल्ह्य़ातील महायुतीच्या उमेदवारांसाठी वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील मैदानावर जाहीर सभा घेतली. सभेला अक्षरशः जनसागर उसळला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझे मित्र दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कर्मभूमीत आल्याचा आनंद होत आहे. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे विकासाचे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे पूर्ण करीत आहेत.

आगामी काळात दुष्काळ मुक्त मराठवाडा घडवायचा आहे. ” हर घर जल” या संकल्पनेने दुष्काळावर मात करायची आहे. मराठवाड्यात जलसंधारण, जलसिंचनाचे प्रकल्प राबवून गोदावरीचे पाणी आणायचे आहे. त्यासाठी वाॅटर ग्रीड योजना राबवून मराठवाडा पाणीदार करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.

३७० कलमाचा विरोध करणाऱ्या विरोधकांना धडा शिकविण्याची पहिली संधी महाराष्ट्राला आली असून आपण यांना धडा शिकविणार का असा प्रश्न उपस्थितांना करून देश भावना विरोधी काम करणारांना धडा शिकविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. कलम रद्द करण्याचा निर्णय आम्ही राजनितीसाठी नाही देशहितासाठी घेतला आहे आणि अपेक्षित बदल घडताना दिसत आहे. विरोधकांनी यावरून फार टीका केली. पण जनतेने मात्र डोक्यावर निर्णयाचे स्वागत केले आहे आणि त्याची पावती या निवडणुकीत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या पाच वर्षात घरे, शौचालय गॅस, , वीज कनेक्शन आदीबाबत सरकारने काम केले असून पुढील पाच वर्षात “जल जीवन मिशन” वर काम करणार असून घराघरात पाणी ही संकल्पना राबविली जाणार असून त्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात असल्याचे ते म्हणाले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।