परळीचे वाटोळे करणा·या धनंजय मुंडेना मते मागण्याचा अधिकार नाहीच ! प्रा . टी . पी . मुंडे यांनी ठणकावले  

0
626

परळी – वौ . ( प्रतिनिधी ) : नगर परिषदेच्या माध्यमातुन परळी शहराचे अक्षरक्षः वाटोळे करून परळीकरांचा छळ करणा·या राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांना मते मागण्याचा अधिकार नाहीच ! अशा शब्दात भाजपा नेते प्रा . टी . पी . मुंडे सर यांनी राष्ट्रवादीच्या टोळक्याला ठणकावले . नगर परिषदेतील सत्तेच्या जोरावर आता परळीकरांना मुलभूत सुविधांपासून दूर ठेवताल तर याद राखा असा सज्जद दमही त्यांनी राष्ट्रवादीला दिला . भाजपा महायुतीच्या उमेदवार ना . पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार रॅली व बौठकामध्ये ते बोलत होते .

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर भाजपा महायुतीच्या उमेदवार ना . पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागाचा यशस्वी प्रचार दौरा केल्यानंतर प्रा . टी . पी . मुंडे सर यांचा झंझावात काल परळी शहरात दाखल झाला . सकाळच्या सत्रात त्यांनी वडार कॉलनी , आंबेडकर नगर , फुले नगर , अशोक नगर , शिवाजी नगर , तलाब कट्टा , गौतम नगर,पद्मावती गल्ली,माणिक नगर आदी भागांना भेटी देवुन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला या दौ·यात प्रा . टी .पी .मुंडे सर यांना नगर परिषदेच्या कारभाराच्या दयनियतेचे दर्शन मतदारांनी घडविले . गल्लो – गल्लीत नागरी सुविधा नाहीत , पाणी वाटपाचे नियोजन नाही . स्वच्छता नाही . रस्ते व नाल्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत आहेत . घाणिच्या साम्राज्यामळे रोगराईचे थौमान मातले आहे . अशा अनेक समस्या मतदारांनी प्रा . टी . पी . मुंडे सर यांच्या समोर मांडल्या . या परिस्थितीवर मतदारांशी बोलतांना त्यांनी या परिस्थितीला नगर परिषदेचे पदाधिकारी व त्यांचे नेते विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेच जबाबदार असल्याचे सांगितले .

परळीचे वाटोळे करणा·या धनंजय मुंडे व त्यांच्या टोळक्याला मते मागण्याचा अधिकार नाहीच ! असे सांगतांना मतदारांनी आता तरी या चोरांपासुन सावध रहावे व मतदानाच्या माध्यमातुन त्यांना कायमचा धडा शिकवावा व परळी शहराच्या सर्वागिण विकासासाठी भाजपा महायुतीच्या उमेदवार ना . पंकजाताई गोपिनाथराव मुंडे यांना विजयी करावे असे आवाहन केले .

यावेळी माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय डवळे, माजी नगरसेवक विठ्ठल दंदे,ओमप्रकाश सारडा, अॅड . संजय जगतकर , शेख इलियास , रघुनाथ होळस , माजी नगरसेवक विश्वनाथ देवकर ,नितीन शिंदे,किशोर केंद्रे,प्रशांत तोतला, नवनाथ शिरसागर ,श्याम गडेकर,दीपक फड, सय्यद बबलु , सोमनाथ आघाव,राहुल केंद्रे, पाळवदे वहिनी,शेख सगीर , व्यंकट भास्कर , राम पवार , शाम जाधव, मनोहर मुंडे , विनोद मानकर , अशोक कांबळे , शिवराज सुरवसे , विजय आटकोरे , आंबा कांबळे , बबन पाडमुखे , शिवकुमार बडे , नुरबानो खाला , लक्ष्मण साळवे , जरीचंद्र मस्के , प्रेमसिंग जुन्नी , प्रकाश वाकडे , पाशाभाई , लक्ष्मण गवारे , गणेश गवारे , दिपक शिंदे , राहुल साळवे , बालाजी व्हावळे , प्रकाश कांकरे , बंडु लांडगे , मिलिंद उजगरे , पप्पु लांडगे , बालासाहेब कांबळे , पिंटु घुंबरे , पिंटू वाघमारे , बुवाजी बनसोडे , मोहन मुंडे , नितीन कांबळे , गोविंद राठोड , महेश मुंडे , आकाश डहाळे , बळीराम लोंढे , गणेश फड, बबन सांगळे , संघशिल डोळस , हरिष पौके , अतुल जाधव , प्रदिप राठोड , गणेश केदार , वाल्मिक फड , गुलाब चव्हाण , रानु बुंदिले , मोहन मुरकुटे , राजेंद्र धोत्रे , शाम चौधरी , अशोक इटकर , रूपेश चव्हाण , सचिन गिते आदी सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते .