ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी छत्रपती उदयनराजे भोसले उद्या परळीत

0
737
Google search engine
Google search engine

गणेशपार येथे जाहीर सभा

परळी दि. १७ —- भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी छत्रपती उदयनराजे भोसले उद्या (ता.१८) परळीत येत आहेत.

शहरातील गणेशपार भागात उद्या दुपारी १.३० वा. उदयनराजे भोसले यांची जाहीर सभा होणार आहे. उदयनराजे भोसले यांचे उद्या हेलिकाॅप्टरने आगमन होणार असून ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचाराची सभा ते घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ ही सभा होत आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजप महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे