आता दर्यापूर मध्ये सुरु होतंय बी.एस.सी. नर्सिंग.

0
839

डॉ. विष्णुपंत भारंबे व श्री. दिलीप पखान  यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली माहिती.

दर्यापूर तालुक्यात २००८ पासून प्रथम सी.बी.एस.ई एकविरा स्कूल ऑफ ब्रिल्लीयांट्स, एकविरा नर्सिंग स्कुल , एकविरा टेक्निकल इन्स्टिट्यूट इ. विविध शैक्षणिक संस्था उभारून, दर्यापूर तालुक्यातील शैक्षणिक पत वाढविण्याचे काम आज पर्यंत डॉ.भारंबे सर , श्री. दिलीप पखान सर यांनी केले आहे.
आपल्या या शैक्षणिक कार्याला पुढे नेत स्व. डॉ. राजेंद्र भट्टड , डॉ. अरुणा भट्टड, श्री.घनश्याम चोंडके , डॉ. उत्कर्ष भट्टड , सौ.पूनम पनपालिया, श्री.अक्षय सपकाळ, श्री.आशिष मेघे यांना सोबत घेवून दर्यापूर तालुक्यात पहिले गुरुकुल बी.एस.सी. नर्सिंग चे कॉलेजची मान्यता आणली आहे असे प्रतिपादन गोदावरी ट्रस्ट चे सह-संचालक डॉ. भारंबे यांनी पत्रकार परिषदेत केले व सदर कॉलेज मध्ये प्रवेश प्रक्रिया २० नोव्हेंबर पासूनच सुरु होणार आहे तरी या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा असे आव्हाहन केले.
सदर कॉलेज सोबतच स्व.डॉ. राजेंद्र भट्टड यांचे दर्यापूर शहरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण करणार असण्याचे प्रतिपादन त्यांच्या पत्नी डॉ.अरुणा भट्टड यांनी परिषदेत केले.

गुरुकुल – बी.एस.सी. नर्सिंग चे कॉलेज दर्यापूर तालुक्यात आल्यामुळे दर्यापूर वासियांना याचा लाभ होणार आहे. सदर संस्थेचे सर्व सभासद हे तालुक्याच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासाकरिता नेहमीच तत्पर असतात.

सदर कॉलेज हे अमरावती जिल्हातील द्वितीय व तालुक्यातील प्रथम कॉलेज असल्याची माहिती सदर पत्रकार सभेत देण्यात आली.

पत्रकार परिषदेत विविध वृत्तपत्रातील पत्रकार , संस्थेचे सभासद  डॉ. अरुणा भट्टड, सौ.पूनम पनपालिया ,डॉ. भारंबे,श्री.दिलीप पखान, श्री.घनश्याम चोंडके , डॉ.उत्कर्ष भट्टड,श्री.अक्षय सपकाळ, श्री. आशिष मेघे ,एकविरा स्कूल चे  प्राचार्य.श्री.तुषार चव्हाण. श्री.सुभाष पनपालिया, इत्यादी उपस्थित होते.