आणि जप्त केलेले रेतीने भरलेले हॉयवा ट्रक पळवून नेले

0
507
Google search engine
Google search engine

तालुका प्रतिनिधि/सिंदेवाही

सिंदेवाही- राजरोसपणे रेती विना वाहतूक परवाना चोरून नेत असतांना दिनांक १४-१०-२०१९ चे रात्री अंदाजे ११-०० वाजताचे सुमारास मुल रोडणे नागपुर चे दिशेला रेती वाहतुक करणारे ५ हायवा ट्रक सिंदेवाही येथील निवडणूक गस्ती पथकाने अडवून चौकशी केली असता, पाचही ट्रक वाहकांकडे वाहतुक परवाना नसल्याचे लक्षात आल्यानंतर गस्तपथक प्रमुख श्री. सलामे नायब तहसीलदार सिन्देवाही यांनी पंचनामा करून पाचही हॉयवा ट्रक तहसील कार्यालयात जमा केले होते परंतु रेती चोरीत तरबेज असलेले हॉयवा ट्रक वाहक यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ट्रक क्रमांक – MH – 40 BG-5834, MH- 40 BG-0898 व MH-40  AK – 6455 ह्या क्रमांकाचे हॉयवा ट्रक पळवून नेण्यात यशस्वी झाले. सिंदेवाही तहसील कार्यालयाचे आवारात उभे असलेले व रेतीने भरून असलेले हॉयवा ट्रक उभे असतांना व साथीदारांनी पळवून नेलेल्या तिन ट्रक मुळे यांचीही हिंमत वाढल्याने दोन्ही हॉयवा ट्रक क्र. MH 40, BL – 8674 आणि MH 40-BL-4006 ह्या क्रमांकाचे हॉयवा ट्रक चे समोरच्या चाकांची पुर्णपणे हवा सोडली असतांना सुद्धा रेती चोरटय़ांनी पुर्णपणे पंक्चर ट्रक पळवून नेण्यात यशस्वी झाले व ट्रकमध्ये भरलेली रेती पंचायत समितीसमोरील रोडवर खाली करून पसार झाले. त्यामुळे नायब तहसीलदार श्री. सलामे यांनी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे एफ. आय. आर. दाखल केला असुन चोरटय़ांनी दाखविलेल्या हिंमतीबाबत तर्क वितर्कांना वाव मिळाला असल्याचे निदर्शनास येत आहे.