मोर्शी येथे देवेंद्र भुयार यांचे विराट रॅली काढून शक्तिप्रदर्शन  – मोर्शी येथे आघाडीची रेकॉर्ड ब्रेक रॅली 

2493

हजारो शेतकरी व युवकांचा जनसमुदाय देवेंद्र भुयार यांच्यासोबत ! 

विशेष प्रतिनिधी –

मोर्शी विधानसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांनी नव्या जोशाने मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , स्वाभिमानी शेतकरी संघटना , मित्र पक्ष , यांच्या वतीने मोर्शी शहरामध्ये जोरदार आणि विराट असे वादळ निर्माण करत शक्तिप्रदर्शन करून विराट रॅली काढुन मोर्शी मतदार संघातील शेतकरी युवकवर्ग यांचे जनसमर्थन वाढत असून त्यांना भक्कम असा पाठिंबा मिळत असल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असल्याचे  चित्र पाहायला मिळत आहे .

त्यांच्या शक्तिप्रदर्शनच्या असंख्य गर्दीने आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरशीची होणार असल्याने राजकीय आखाडा चांगलाच गाजत  आहे.

ढोलताशाच्या गजरात मतदार संघातील असंख्य महिला व पुरुष रॅलीत सहभागी झाले होते. असंख्य नागरिकांच्या आशीर्वादाने त्यांनी आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. देवेंद्रभाऊ आगे बढो,हम तुम्हारे साथ है, आपलाच गेरू अन आपलाच चुना शेतकऱ्याच्या पोराला निवडून आणा ,अश्या घोषणांनी मोर्शी शहर दणाणून गेले होते देवेंद्र भुयार यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना , प्रहार पक्ष , स्वाभिमानी पक्ष , यांनी जाहीर पाठिंबा दिला असून शेकडो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते .

या रॅलीतील उपस्थितांच्या संख्येने अनेक दिग्गज नेत्यांचे डोळे चांगलेच विस्पारणारी ठरली. अपेक्षित पेक्षा अनपेक्षित दिग्गज मात्र उत्साहात सहभागी झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. केवळ प्रचार रॅली नाही तर जणू विजयी रॅली आहे, असे वातावरण निर्माण करण्यात आज तरी काँग्रेस ,  राष्ट्रवादी काँग्रेसला , स्वाभिमानी शेतकरी संघटना , व मित्र पक्ष , यांना यश मिळाले. अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सर्वत्र होत आहे.

यावेळी प्रचार रॅलीमध्ये माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख , विक्रम ठाकरे , गिरीश काराळे ,  अशोक रोडे ,  शेखर भोयर , मध्यप्रदेश येथील कॅबिनेट मंत्री सुखदेव पानसे , पूजा मोरे , स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोकळे , जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड , बंगाले पाटील , अनिल खांडेकर ,  यांच्यासह काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , स्वाभिमानी शेतकरी संघटना ,  प्रहार पक्ष , स्वाभिमानी पक्ष , यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

नागरिकांच्या असंख्य प्रतिसादाणे  प्रचंड आत्मविश्वास वाढला…

मोर्शी येथे निघालेली प्रचार रॅली विजयात रूपांतरित करण्याचा निर्धार मतदारांनी केला असून  उत्साह वाढविणारा दिसला, जातीय समीकरण तोडून पुन्हा सर्वानी एकत्र यावे व परकीय शक्तींना रोखावे, असा ठाम आशावाद जाणीवपूर्वक पेरण्यात आला, त्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यात मोठा आत्मविश्वास वाढला असल्याचे आघाडीच्या सूत्रांनी स्पष्ट केले. तर घोडा मैदान जवळ आहे. मतदार आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांना कौल देत असल्याचे चित्र दिसत आहे .