निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचार गाडीची तोडफोड-प्रचारातील आघाडीची विरोधकांना धास्ती ; ड्रायव्हरला मारहाण झाल्याचा आरोप

0
1461
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे :- शहजाद खान :-

निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढत असतांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचाराची धास्ती घेत विरोधक कार्यकर्त्यांनी निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचार गाडीची तोडफोड करीत ड्रायव्हरला मारहाण केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर घटना धामणगाव रेल्वे तालुक्यात घडली आहे. निलेश विश्वकर्मा यांनी प्रचारात घेतलेल्या आघाडीमुळे भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत चीड निर्माण झाली असून त्यातूनच ही तोडफोड झाल्याचे मतदारसंघात बोलल्या जात आहे.

गेल्या आठ दिवसापासून निलेश विश्वकर्मा यांनी आपला प्रचाराचा झंझावात चांगलाच वाढविला असून प्रत्येक गावातील मतदारांपर्यंत ते स्वतः पोहचत आहे. गावागावातील हायटेक प्रचार, प्रचारातील हृदयाला हात घालणारे मुद्दे, महिलांचा व युवकांचा गावागावात मिळणारा प्रतिसाद तसेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जोश पाहून विरोधकांनी धास्ती घेतली व दुहेरी होणारी निवडणूक निलेश विश्वकर्मा यांच्या उमेदवाराने व वंचितच्या तिकीट मुळे तिहेरी लढतीत परावर्तित झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी सुडबुद्धिने धामणगाव रेल्वे परिसरात गाडी क्रमांक एम एच ०४ – ६४८३ टाटा एसी ह्या गाडीचा समोरील काच फोडून विश्वकर्मा यांचे पोस्टर फाडले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे व जयहिंद मंडळाच्या कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी वाढली असून निलेश विश्वकर्मा यांचा विजयरथ रोखण्याचा हा प्रयत्न निषेधार्थ असल्याचे मत अनेक जानकारांनी सांगितले.

 

अशा हल्ल्यांना घाबरणार नाही – निलेश विश्वकर्मा

माझा लढा हा प्रस्थापित व घराणेशाहीच्या विरोधातील लढा आहे. भाजपची घराणेशाही आणि काँग्रेस उमेदवाराची वाढती मुजोरी याला पर्याय म्हणून आपली उमेदवारी असून आपल्या होणाऱ्या विजयाच्या धास्तीतून त्यांचा हा हल्ला असून या भ्याड हल्ल्याला आपण घाबरणार नसल्याचे निलेश विश्वकर्मा यांनी सांगितले.