बहिणीबद्दल अपशब्द वापरणा·या धनंजयला मतदार माफ करणारच नाहीत – प्रा . टी . पी . मुंडे

0
689

* धनंजयच्या पापाचा घडा भरल्यानेच खरा चेहरा जनतेसमोर आला
परळी – वौ . ( प्रतिनिधी ) : स्व . गोपिनाथराव मुंडे यांच्याच नावाचा वापर करुन राजकारणात आलेला भाऊ स्वत: च्या बहिणीबद्दल खालच्या पातळीवरचे अपशब्द वापरतो यामुळेच परळी मतदार संघ व महाराष्ट्रात संतापाची लाट आली असुन परळीतील मतदार राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांना कदापीही माफ करणार नाहीत. धनंजय मुंडे यांच्या पापाचा घडा भरल्यानेच त्यांचे खरे विकुत रूप जनतेसमोर आले . अशा मनोवृत्तीच्या लोकांपासुन मतदारांनी सावध रहावे असे आवाहन भाजपा नेते प्रा . टी . पी . मुंडे सर यांनी केले .
परळी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा पराभव निश्चित आहे . त्यामुळे मानसिक संतुलन बिघडलेले धनंजय मुंडे हे बिथरले आहेत . विडा येथील प्रचार सभेत तर त्यांच्या विचारांनी खालची पातळी गाठली व स्वत: च्या बहिणीबद्दलच अपशब्द वापरून बिभत्स हातवारे केले . राज्याच्या महिला, बालकल्याण व ग्रामविकास मंत्री ना . पंकजाताई गोपिनाथराव मुंडे यांच्यासारख्या कर्तुत्ववान महिलेबद्दल , लेकीबद्दल , बहिणीबद्दल असे संतापजनक वक्त्वय केल्याने परळी मतदार संघात व बीड जिल्ह्यासह राज्यात धनंजय मुंडे यांच्या बद्दल संतपाची लाट निर्माण झाली आहे .
ज्या स्व . गोपिनाथराव मुंडे यांच्या नावावर राजकारणाची दुकानदारी चलविता त्यांच्याच लेकीबद्दल असे अपशब्द वापरतांना आपल्याला लाज वाटली नाही का ? असा सवाल भाजपा नेते प्रा . टी . पी . मुंडे सर यांनी उपस्थित करून या वक्तव्याच्या कर्माची फळे धनंजय मुंडे यांना भोगाविच लागतील परळी मतदार संघातील मतदार कदापीही त्यांना माफ करणार नाहीत असा सूचक इशारा त्यांनी दिला .
स्वत: चे राजकीय आस्तित्व संपत असल्याचे दिसत असल्याने धनंजय मुंडे यांनी घाबरणे साहजिक आहे . परंतू जाहीर भाषण करतांना स्वत: च्या बहिणीच्या नात्याची व तिच्याकडून बांधन घेतलेल्या राख्यांची तरी आठवण ठेवायला पाहिजे होती . धनंजयच्या बेताल वक्तव्यामुळे मनस्ताप झालेल्या पंकजाताई मुंडे यांना व्यासपिठावरच भोवळ आली याला धनंजय मुंडेच जवाबदार असल्याचेही प्रा . टी . पी . मुंडे सर यांनी म्हटले आहे . अशा विकृत मनावृत्तीच्या व्यक्तींना मतदानातुन धडा शिकवुन कायमचे हद्दपार करा व भाजपा महायुतीच्या ना . पंकजाताई मुंडे यांना विजयी करा असे आवाहन ही त्यांनी केले आहे .