अचलपूर विधानसभा- निवडणूक कामाकरिता जाणाऱ्या नायब तहसीलदार यांचा गाडीला अपघात – नायब तहसीलदारांना अमरावती वरून नागपूर रेफर

0
7018
Google search engine
Google search engine

कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्नात गाडी पलटली

अचलपूर :- चांदुर बाजार येथून निवडणूक कामाकरिता नायब तहसीलदार व इतर 4 कर्मचारी खासगी वाहनाने अचलपूर येथे जात असताना तोंडगाव नजीक कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्नात गाडी पलटी झाल्याने नायब तहसीलदार गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तात्काळ अमरावती रेफर नंतर तिथून नागपूर रेफर करण्यात आले आहे इतर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. श्री गजानन पाथरे हे नायब तहसीलदार आहेत जे चांदुर बाजार ला कार्यरत आहेत