राष्ट्रवादीच्या चिन्हासोबत धनंजय मुंडेंची पत्रकार परिषद

0
713
Google search engine
Google search engine

निवडणुक आयोग कारवाई करणार?

परळी दि.२० – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत आले आहेत.कालपासून बीड जिल्हासह संपुर्ण राज्यात सोशल मिडिया सह,रस्त्यावर उतरून भाजपसह विविध संघटनेकडून धनंजय मुंडेंचा निषेध केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर,आपले मत मांडण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.मात्र,ही पत्रकार परिषद वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.निवडणुकीच्या आचारसंहितेनुसार आता मतदानाला एक दिवस बाकी राहिला आहे.त्यामुळे,उमेदवारास निवडणुक आयोगानुसार खुलेआम पध्दतीने कोणताही प्रचार करता येत नाही.

तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेल्या घड्याळासह यामध्ये पक्षाचे अध्यक्ष आणि अजित पवार यांचा फोटो आहे.व याच्या बाजुला बसून धनंजय मुंडे हे पत्रकार परिषदेत बोलत आहेत.त्यामुळे,धनंजय मुंडे पक्षाच्या चिन्हासह प्रचार करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.त्यामुळे,आता निवडणुक आयोग या प्रकारणाकडे काय कारवाई करणार का?हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.