अकोटात युवा मतदारांत ठरले सेल्फी पॉइंटचे आकर्षण

0
817
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके –

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक विभागातर्फे यावेळी विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली होती तसेच या अंतर्गत विविध उपक्रम देखील राबवण्यात आले याच अंतर्गत आज शहरातील काही मतदान केंद्रांवर वोटर सेल्फी पॉइंट निर्माण करण्यात आले होते या वॉटर सेल्फी पोइंटच्या प्रेमात अनेक तरुण-तरुणी पडलेत. शहरातील कॉलेज रोडवरील सरस्वती विद्यालयातील सेल्फी पॉइंटवर तरुणाईने यावेळी एकच गर्दी केली होती यावेळी सेल्फी पॉइंटचा मोह अनेक बुजुर्ग मतदारांनीही आवरता आला नाही एकंदरीतच आजच्या मतदान प्रक्रियेत अकोट शहरात तरी निवडणुकीतील उमेदवारांना पेक्षा सेल्फी पॉइंट भाव खाऊन गेला एवढं मात्र निश्चित.