कोणाच्या बालेकिल्ल्यात कोण होणार विजयी,अनेक मोठ्या राजकीय नेते याची प्रतिष्ठापणाला

0
702
Google search engine
Google search engine

कोणाच्या बालेकिल्ल्यात कोण होणार विजयी,अनेक मोठ्या राजकीय नेते याची प्रतिष्ठापणाला

: विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी २४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. प्रशासनामार्फत मतमोजणीची तयारी सुरू करण्यात आली आहे. मतमोजणीत आठ ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार असल्याने, याबाबत मतदारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
जिल्ह्यातील अमरावती, बडनेरा ,अचलपुर, मोर्शी, दर्यापूर, मेळघाट,तिवसा,धामणगाव रेल्वे या आठ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार अाहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. आठ ही विधानसभा मतदारसंघांत मतमोजणीची तयारी करण्यात आली आहे. कोणत्या मतदारसंघात कोण बाजी मारणार, याबाबत मतदारांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.