अचलपुर मतदार संघाचे नवीन शिलेदार कोण,?बच्चू कडू,बबलू देशमुख सुनीता फिसके याच्यात होती तिरंगी लढत

0
1687

अचलपुर मतदार संघाचे नवीन शिलेदार कोण,?बच्चू कडू,बबलू देशमुख सुनीता फिसके याच्यात होती तिरंगी लढत

बादल डकरे:- चांदुर बाजार

राज्यात 21 तारखेला पार पडलेल्या मतदाना नंतर आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे.अचलपुर विधानसभा निवडणूक मध्ये आघाडी तसेच युतीचे उमेदवार यांची लढत थेट तीन वेळा या मतदार संघाचे नेतृत्व करणारे आमदार बच्चू कडू याच्या सोबत राहिली होती.त्यामुळे या लढत मध्ये अचलपुर चा शिलेदार कोण होणार हे आज स्पस्ट होनार आहे.तर 21 तारखेच्या नंतर अनेक ठिकाणी आकड्याची मोडामोड सुरू झाली होती.तर या निवडणुकीत जय आणि पराजय होत असल्याने अनेक याचे मन दुखावतील तर काहीच आनंद हा गगनात न राहणार असणार आहे..

2009 आणि 2014 च्या निवडणूक चा आकडेवारी पाहता आमदार बच्चू कडू याना जवळपास 60627 मते मिळाली तर 2009 च्या निवडणूक मध्ये अनंतराव गुढे याना केवळ 24824 मतावर तर वसुधाताई देशमुख यांना 54884 मते मिळाली होती.तर 2014 च्या निवडणूक मध्ये आघाडी आणि भाजपा शिवसेना वेगळ्या निवडणूक रिगणात होत्या त्यामध्ये भाजप चे उमेदवार अशोकराव बन्सोड याना 49064 मत तर शिवसेना वर निवडणूक रिनागत असलेल्या आणि त्यावेळी नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुरेखाताई ठाकरे यांना केवळ 5000 मत मिळाले होते तर 2009 च्या तुलनेत वसुधाताई देशमुख यांना फक्त 3000 मत मिळाले होते तर आमदार बच्चू कडू याना 59234 मत मिळाले होते.त्यामुळे या निवडणुकीत आमदार बच्चू कडू याना पगडा तगडा वाटत असला तरी निवडणूक मध्ये युतीचे उमेदवार आणि आघाडीचे उमेदवार याची लढत बच्चू कडू याचा सोबत होती.तर मागील निवडणूक मध्ये रफिक शेख यांनी बहुजन समाज पार्टी कडून निवडणूक लढविली होती.त्यात त्यांना 20602मत मिळली होती मात्र यावेळी त्यांनी आघाडी चे उमेदवार बबलू देशमुख यांना पाठींबा दिला असल्याने याचा परिणाम फारसा आमदार बच्चू कडू यांच्यावर होणार नसल्याचे दिसत आहे.

भाजप पक्षला हा मतदार संघ न मिळाल्याने अनेकांची नाराजी झाल्याचे अचलपुर मतदार संघात दिसत होते.तर काही भाजप चे नेते हे थेट आघाडी उमेदवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा शुद्ध सुरू होती.मात्र आताच्या विधानसभा निवडणूक मध्ये 2014 च्या निवडणूक मधील अनेक कार्यकर्ते ही प्रहार सोबत मिळली त्यामुळे या निवडणुकीत प्रहार चा पगडा भारी वाटत आहे.मात्र मतदार यांनी आपला कौल कोणाला दिला हे आज चित्र स्पस्ट होणार आहे.
याच 2019 च्या निवडणूक मध्ये आमदार बच्चू कडू याच्या पराजय साठी सर्वच एक झाले असल्याचे या निवडणुकीत दिसून आले.तर युतीचे उमेदवार जेवढे अधिक मत घेणारे त्यावरून आमदार बच्चू कडू याच्या विजय कडे वाटचाल राहणार असल्याचे मत राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण ठरत आहे.