चांदूर रेल्वे –
तालुक्यातील धनोडी येथील २६ वर्षीय मूकबधिर असलेला युवक ९ ऑक्टोंबर पासून बेपत्ता झालेला आहे. अजूनही तो घरी परतला नाही.
धनोडी येथील २६ वर्षीय चंदन दिवाकर भाले हा युवक अमर रमेशराव जोशी यांच्याघरी राहतो. तो चांदूर रेल्वे येथील एसटी आगारात कंत्राटी सफाई कामगार आहे. ९ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता बाहेर जातो असे सांगुन निघुन केला. परंतु अद्यापही घरी परत आलाच नाही. चंदन भाले यांची उंची १६५ ते १६७ सें.मी. दरम्यान असुन रंग गोरा, जबुत बांधा, लांबट अंडाकृती चेहरा आहे. तरी अशा वर्णनाचा व फोटो असलेला युवक कोणालाही काढल्यास त्यांनी धनोडी येथील अमर जोशी यांना किंवा तळेगाव दशासर पोलीस स्टेशन अथवा जवळील पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.