पत्रकारास मारहाण कॅमेरा व माईक फोडला ; गुन्हा दाखल

0
1893
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद /प्रतिनिधी

पोलीस ठाणे, तुळजापूर: दि. 24.10.2019 रोजी दुपारी 02.00 ते 02.30 वा. सु. तुळजापूर विधानसभा मतदार संघाची मतमोजणी चालू असतांना तुळजापूर येथील सैनिक शाळेच्या मैदानावर काही तरुण धिंगाणा-हुल्ल्डबाजी करत होते. या प्रसंगी मतदान कव्हरेज करण्यासाठी हजर असलेले वार्ताहर आयुब अब्दुल गणी शेख वय 28 वर्षे रा. नळदुर्ग, ता.तुळजापूर विधानसभेच्या निकालानंतर भाजपचे काही कार्यकर्त्यांनी पैशाची उधळपट्टी चे छायाचित्रन करत होते. यावर जमावातील विजय गंगणे यांच्या इशाऱ्यावरुन नवनाथ टिंगरे उर्फ मुन्ना, कुलदिप मगर व त्यांच्या सोबत इतर चार-पाच तरुणांनी आयुब शेख यांच्याशी झटापट करुन छायाचित्रन घेण्यास त्यांना विरोध केला. व न्यूज चॅनेल चा कॅमेरा व माईक फोडण्यात आला नवनाथ टिंगरे याने आयुब शेख यांच्या हातातील मायक्रोफोन हाताने तोडुन त्यांच्या कॅमेऱ्याचे नुकसान केले. या प्रसंगी तेथे तैनात असलेल्या पोलीसांनी तो जमाव पांगवून आयुब शेख यांची सुटका केली. अशा मजकुराच्या आयुब शेख यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द पोलीस ठाणे, तुळजापूर येथे भा.दं.वि. कलम 323, 143, 427 सह म.पो.का. कलम 135 प्रमाणे गुन्हा दि. 25.10.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.