दिवाळी तथा धनतेरस च्या मुहूर्तावर वाहन खरेदीस ग्राहकांचा जोर

0
704
Google search engine
Google search engine

 

आकोटः ता.प्रतिनिधी
सणांचा राजा दिवाळीत बाजारपेठ सगळीकडे गर्दीने फुलून जात आहे अशातच दिवाळी तथा धनतेरस च्या मुहूर्तावर सगळीकडे ग्राहकांचा वाहन खरेदीस जोर दिसतो आहे. शहरातील दर्यापूर रोड मार्गावरील शेतकरी मोटर्स येथे तालुक्यातील विविध गावातील अनेक ग्राहकांनी भेट देत दिवाळीच्या मुहूर्तावर आपली आवड निवड लक्षात ठेवून हिरो बाईक बुक केल्या आहेत या दिवाळीला विशेष करून ग्राहकांनी सुपर स्प्लेंडर एचएफ डीलक्स फॅशन प्रो या हिरो बाइकना आपली पसंती कायम ठेवली असल्याचे शेतकरी मोटर्सचे संचालक नंदकिशोर शेगोकार यांनी यावेळी बोलताना सांगितले ग्राहकांचे समाधान हेच आमचा आनंद असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले याप्रसंगी दिवाळीनिमित्त त्यांनी समस्त ग्राहकांना व शहरवासीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.