वाचू आनंदे साहित्य दिवाळी…

0
644

 

आकोटः संतोष विणके

दिवाळी हा जसा आनंदाचा… खमंग पदार्थांचा … सण तसाच तो महाराष्ट्रात दिवाळीत मिळणाऱ्या वाचनादी वैचारिक मेजवानी साठी ही प्रसिद्ध आहे. दिवाळीत येणारे दिवाळी अंक हा वैचारिक मेजवानी फराळ तर कुणालाही हवाहवासा वाटणारा असाच आहे .गेल्या तीस वर्षापासून वाचन आनंद घेत दिवाळीचा आनंद लुटणारे कवी अपुर्व( प्रा.प्रवीण पोटे )यांनी त्यांच्या वाचन आठवणी विदर्भ24news सोबत शेअर केल्यात यावेळी त्यांनी त्यांचे आवडते कवी ग्रेस यांच्या अनेक साहित्य कलांची उजळणी केली. तर या वर्षीच्या दिवाळी अंकातून वाचायला आवडणारा त्यांचा अभिप्रायही त्यांनी विदर्भ24news जवळ व्यक्त केला तसेच याप्रसंगी सर्व शहरवासीयांना त्यांनी वाचू दिवाळी तथा दिवाळी दीपक पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.