चला साजरी करू प्रदूषण मुक्त दिवाळी …

0
1017
Google search engine
Google search engine

 

आकोटः दिवाळी म्हटलं का सर्वांनाच आठवते ते फटाक्यांची आतिषबाजी… फटाक्यांचा दणदणाट… दिव्यांची आरास… आणि सोबतच आनंद उत्साह… पण हा आनंद उत्साह कायम ठेवत सर्वांनी प्रदूषणमुक्त तेजाची दिवाळी साजरी करूयात असे आवाहन सचिन ढमाळ यांनी विदर्भ24news शी बोलताना केले. दिवाळीनिमित्त त्यांनी सर्व शहरवासीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या असून आवाजाची… गोंगाटाची दिवाळी साजरी करण्यापेक्षा गरजवंतांना च्या मदतीला धावून जाणारी आनंददायी दिवाळी समाधानाची दिवाळी साजरी करूयात असे मत स्थानिक दर्यापूर रॉड मार्गावरील ढमाळ गॅस एजन्सीचे सचिन ढमाळ यांनी व्यक्त केले. तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी झाडांची कत्तल …लाकडां जाळून चुलीचा केलेला धूर व त्यातून खराब होणारे आपल्या महिला वर्गाच्या आरोग्य ह्याला टाळुयात एलपीजीचा वापर करूयात प्रदूषण मुक्त भारत ठेवूयात असे आव्हान केले असून समस्त शहरवासीयांना त्यांनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.