“तुळजापूर येथे बेकायदेशीर जमाव जमवून राजाभाऊ माने यांना मारहाण.”

0
1031
Google search engine
Google search engine

“तुळजापूर: बेकायदेशीर जमाव जमवून किरकोळ कारणावरुन मारहाण.”

पोलीस ठाणे, तुळजापूर: अभिषेक राजेंद्र माने रा. तुळजापूर यांनी खाकरुन थुंकल्याच्या कारणावरुन 1) विनोद गंगणे उर्फ पिंटु 2) योगेश दळवी दोघे रा. तुळजापूर यांनी त्यांना शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन अभिषेक माने हे वडील राजेंद्र माने यांच्या सोबत तक्रार देण्यासाठी दि. 26.10.2019 रोजी 15.40 वा. सु. पोलीस ठाणे, तुळजापूर येथे गेले होते. त्यावेळी 1) विनोद गंगणे उर्फ पिंटु 2) सुरज नन्नु साठे 3) विशाल छत्रे 4) योगेश दळवी 5) मनोज गवळी 6) अनंत गंगणे उर्फ नंदु सर्व रा. तुळजापूर हे पोलीस ठाणे, तुळजापूर येथे बेकायदेशीर जमाव घेउन आले. अभिषेक माने व त्यांचे वडील राजेंद्र माने या दोघांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. अशा मजकुराच्या अभिषेक माने यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द पोलीस ठाणे, तुळजापूर येथे भा.दं.वि. कलम 143, 323, 504, 506 सह म.पो.का. 120, 135 प्रमाणे गुन्हा दि. 26.10.2019 रोजी नोंदवण्यात आला आहे.