*‘रन फॉर युनिटी’मध्ये सहभागी व्हा – जील्हा प्रशासनाचे आवाहन-  गुरुवार दि.३१ रोजी आयोजन*

0
535
Google search engine
Google search engine

अमरावती –  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, दि.३१ रोजी ‘रन फॉर युनिटी’ अर्थात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडमध्ये अमरावती शहर व जिल्ह्यातील युवक-युवती, खेळाडू, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दर वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही दौड विभागीय क्रीडा संकुल येथून सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे.यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी ७ वाजेपर्यन्त विभागीय क्रीडा संकुल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.