आमदार देवेंद्र भुयार यांनी केली मोर्शी तालुक्यातील संत्रा बागांची पाहणी ><संशोधकांनी संत्रावर संशोधन करणे गरजेचे -- आमदार श्री देवेंद्र भुयार 

0
4320

शास्त्रज्ञ सुद्धा अज्ञात रोगाबद्दल अनभिज्ञ ! 

मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत !

रुपेश वाळके :-

मोर्शी वरुड तालुका हा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून मोर्शी वरुड तालुक्यात सर्वाधिक संत्रा उत्पादक शेतकरी असून हजारो हेक्टर जमिनीवर संत्रा पिकाचे उत्पादन घेतले जाते असून मोर्शी वरुड तालुक्यात संत्रा उत्पादनात करोडो रुपयांची उलाढाल होत असून   शासनाच्या व कृषी संशोधकांच्या दुर्लक्षित पणामुळे शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन वेळेवर मिळत नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना या अज्ञात रोगावर काय उपाय योजना कराव्या हे माहित नसल्यामुळे संत्रा झागांवर शेंडे मर , संत्रा गळती , पानगळ , यासख्या अनेक अज्ञात रोगाने संत्रा बागांवर आक्रमण केल्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे , संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर   सतत तीन वर्षांपासून संकटांची मालिकाच सुरु आहे गारपीट  , ओला दुष्काळ , कोरडा दुष्काळ , अज्ञात रोगाची लागण , संतऱ्याला अत्यल्प भाव ,  संत्रा गळती , अश्या दृष्ट्चक्रात संत्रा उत्पादक शेतकरी भरडल्या जात आहे दुष्काळामुळे लाखो संत्रा झाडे वाळली शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे मात्र  शासनाच्या व संशोधकांच्या  उदासीनतेमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन वेळेवर मिळत नसल्याने या गंभीर विषयाची दखल  आमदार देवेंद्र  भुयार यांनी घेतल्यामुळे कृषी विभागाला मोर्शी  तालुक्यातील संत्रा बागा पाहण्याकरिता बोलावून अज्ञात रोगाबद्दल माहिती देऊन कृषी विभागाला आमंत्रीत केले त्यावेळे उप विभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते  यांनी या गंभीर विषयाची दखल घेऊन  कृषी विभाग जागा झाला असून  मोर्शी वरुड तालुक्यातील संत्रा बागांची पाहणी करण्याकरिता मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार ,यांनी संत्रा गळती ने नुकसान झालेल्या संत्रा बागांची पाहणी केली त्यावेळी कृषी विभागाचे उप विभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते ,  मंडळ कृषी अधिकारी  पचपपोहर , संदीप रोडे , नरेंद्र जिचकार , नितीन लुंगे ,   नरेंद्र जिचकार , रुपेश वाळके , शेरा खान , नितीन काकपुरे ,  पर्यवेक्षक निलेश ढोके , कृषि साह्ययक कोल्हे मॅडम ,   प्रवीण सातव ,दिनेश चौधरी ,  किशोर राऊत  सागर गेडाम ,यासह आदी संत्रा उत्पादक शेतकरी यांच्या उपस्थितीत मोर्शी तालुक्यातील सालबर्डी , दापोरी , डोंगर यावली , घोडदेव ,  आदी भागातील संत्रा बागांना भेटी देऊन तेथील संत्रा बागांवर असलेल्या अज्ञात रोगांची व  संत्रा गळती झालेल्या संत्रा बागांची पाहणी करून मोर्शी वरुड तालुक्यातील  संत्रा बागांची पाहणी केली काही संत्रा बागांवर अज्ञात रोगाने थैमान घातले असून शास्त्रज्ञ सुद्धा या अज्ञात रोगापासून अनभिज्ञ  असल्याचे निदर्शनास आले असल्यामुळे संशोधकांसाठी सुद्धा हा संशोधनाचा विषय असून या गंभीर विषया संदर्भभा  अजूनही उदासीन असून कृषी अधिकाऱ्यांना व शास्त्रज्ञ मंडळींना या अज्ञात रोगाचे निदान लागता लागेना अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसून संत्रा बागा उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे तरीही जिल्हा कृषी विभाग उदासीन असल्याचे दिसत आहे .

मोर्शी वरुड तालुक्यात भीषण दुष्काळामध्ये हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची लाखो संत्रा झाडे वाळली त्यामुळे मोर्शी तालुक्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले शासनाकडून अजूनही संत्रा झाडाच्या सर्वेक्षणाचे आदेश देऊनही अद्याप मदत मिळालेली नाही ही शोकांतिका आहे , त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती  रोष निर्माण होतांना दिसत आहे .

सोबतच मोर्शी  वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पाण्याची व्यवस्था करून संत्रा झाडे वाचवून आंबिया बहार घेतला मात्र त्या आंबिया बहाराला अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. याचा तालुक्यातील संत्रा उत्पादकांना जबर फटका बसणार असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वाळलेल्या संत्रा झाडांचे व आंबियाच्या गळतीचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे.

मोर्शी वरुड तालुक्यात ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रा झाडे आहेत. संत्रा उत्पादक शेतकरी दोन बहारात उत्पादन घेतात. यामध्ये आंबिया मृग बहाराचा समावेश आहे. या वर्षी सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने मृग बहार काही प्रमाणात हातचा गेला, तर दुसरीकडे दुष्काळातही मोठ्या मेहनतीने संत्रा झाडे जगवून फुलवलेला आंबिया बहाराचा संत्रा मात्र अज्ञात रोगाने गळू लागला आहे.

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना विविध खासगी  कंपनीच्या सल्ल्याने या रोगांवर उपाय योजना  केल्या जात असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची हजारो रुपयांची औषध फवारणी व ड्रेंचिंग केले जात असून त्यांची आर्थिक  पिळवणूक होतांना दिसत आहे त्यामुळे  शासनाने प्रथम या रोगावर संशोधन करून योग्य उपाययोजना करण्याची मागणी  आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे  .