अकोट तालुक्यात परतीच्या पावसाचा कहर-एक ठार, एक जखमी

0
741
Google search engine
Google search engine

अकोट ता.प्रतिनिधी :-

अकोट तालुक्यात परतीच्या पावसाचा बुधवारी कहर बरसला परतीच्या पावसासह कडाडणाऱ्या विजांनी
तालुक्यात एक शेतमजुर ठार, तर एक गंभिर जखमी झाला आहे.काल विजांच्या कडकडाटात बरसलेल्या पावसात तालुक्यातील लाडेगाव शेतशिवारात अंगावर विज पडल्याने एका शेतमजूराचा जागेवरच मृत्यू झाला. तर दुसरा शेतमजुर गंभीर जखमी झाला आहे.शेतात काम करत असतांना दुपारी३.३० वाजताअचानक विज कोसळल्याने बेलूरा येथील शेतमजूर दादाराव पळसपगार यांचा मृत्यु झाला. तर अनील पंचाग हा शेतमजुर जखमी झाला आहे. यावेळी गावकऱ्यांनी धावपळ करत रुग्णवाहिकाद्वारे जखमीला अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता पोहोचविले जखमीला पुढील उपचाराकरीता अकोला नेण्यात आले असल्याचे गावकरींनी सांगीतले.