*शेतकऱ्यांच्या डोळयात पाणीच पाणी;पावसाचा जोर चालूच*

425

अकोटः ता. प्रतिनिधी

परतीच्या पावसाने आकोट तालुक्यात आपला मुक्काम चांगलाच ठोकलेला दिसतो आहे.यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत असुन बळीराजा हवालदिल झाला आहे. मुंडगाव ,लामकाणी ,देवरी,वणी वरूळा, बळेगाव, आलेगाव परिसरात विजेच्या कडकड्यासह व वाऱ्यासह ता.(२९) रात्री स्थानिक व परिसरातील गावामध्ये एक ते दोन तास वीजेच्या कडकडाट्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सतत अधुन मधून पाऊस पडत असल्याने शेतातील कपाशी व ज्वारीला कोंब फुटले आहे . रात्रीच्या वाऱ्यामुळे लामकाणी येथील शेतकरी सलीम पठान यांच्या शेतातील कपाशी जमीन दोस्त झाली आहे.आधी मुग, उदीड गेला आता कपाशी वाऱ्यामुळे झोपली त्यामूळे परिवार कसा चालवायचा असा प्रश्न पडला आहे.
एकिकडे बॅकेच कर्ज डोक्यावर आहे .शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. नुकसानाचे पंचनामे अजून झाले नाहीत. मदत पदरात कधी पडेल, या प्रश्नांसह भविष्याची चिंता शेतकरी सलीम पठान ,निकेश भिसे ,श्रीकृष्ण बघे ,डिगांबर सासनरकर, सुभाष वाकोडे,वैभव तिवाने,राजकुमार भिसे,जयेश भिसे,अभिजीत भिसे, विठ्ठल बायस्कार ,संदिप काळे, सुनिल म्हसाळ, शाम कडू संजु भिसे या शेतकऱ्यांनि व्यक्त केली.

जाहिरात