उद्या १ नोव्हे. ला गुरुमाऊली पालखी सोहळ्याचे आळंदीला प्रस्थान

0
569
Google search engine
Google search engine

————————
आकोट: संतोष विणके

श्रद्धेय श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळा पायदळ दिंडीचे आळंदी( देवाची)करिता प्रस्थान शुक्रवार दि.१नोव्हेंबरला सकाळी १० होत असून या दिंडीत गांवोगांवचे वारकरी भाविक सहभागी होत आहेत.
श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे पायदळ दिंडीत सहभागी होण्यासाठी वारकरी दाखल झाले असून येथे प्रस्थान सोहळा संपन्न होत आहे.पहाटे ‘श्रीं’चा महाभिषेक,पालखी रथाचे पुजन तथा स.९वा ह.भ.प.श्री ज्ञानेश प्रसाद पाटील यांचे प्रस्थानपर प्रवचन होत असून स.१०वा पालखी सोहळ्याचे भावपूर्ण प्रस्थान होईल. यावेळी वासुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
पालखी रथ सोहळा शहराच्या मुख्यमार्गाने मार्गक्रमण करित गुरुमाऊलींच्या निवासस्थानी अल्पसा मुक्काम घेवून दु.१२वा पुष्पांजली मंगलकार्यालय येथे भोजन अवकाश होईल.येथे संस्थेचे विश्वस्त दादाराव पुंडेकर यांनी पालखीचा सोहळा आयोजित केला आहे.

दरवर्षीप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.वासुदेवराव महाराज महल्ले यांचे नेतृत्वाखाली श्रद्धासागर ते आळंदी असा ५१० कि.मी.चा पायदळ प्रवास करुन १७नोव्हेबरला दिंडी पोहोचणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी व आळंदी यात्रेत सहभागी होईल पालखीचे मुक्काम सिद्धबेट क्षेत्री १८ते २५दरम्यान श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह,प्रवचन किर्तनादी भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.हे पायदळ दिंडीचे ९वे वर्ष आहे अशी माहीती दिंडी व्यवस्थापक ह.भ.प.अंबादास महाराज मानकर यांनी दिली.