चारित्र्यवर संशय घेऊन पत्नीची हत्या करून मुलाच्याही हत्येचा प्रयत्न. अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्यातील घटना.

0
4220
Google search engine
Google search engine

शशिकांत निचत / अमरावती जिल्हा प्रतिनिधी:-

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या शरीरावर धारधार शस्त्राने वार करून तिची हत्या व पोटच्या मुलाचीही धारधार शस्त्राने हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील हिरुळपूर्णा या गावात घडली.हत्ये प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपी आशिष पारधी याने काल मध्यरात्री आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करून तिच्यावर धारधार शस्त्राने पोटावर व मांडीवर वार करून तिची हत्या केली .व मुलगा देवानंद यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला.दरम्यान यात मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.हत्ये संमधी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.