अवकाळी पाऊस – प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

0
595

अमरावती- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अवेळी पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी प्र. जिल्हाधिकारी संजय पवार यांनी केली.
भातकूली तालुक्यातील वासेवाडी व कोलटेक येथील गावांना भेटी देत शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व सर्वेक्षणापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी बाळगण्याचे निर्देश देखील यंत्रणांना दिले. या पाहणी दरम्यान श्री. पवार यांच्या समवेत तिवसा भातकुलीचे उपविभागिय अधिकारी नरेंद्र फुलझेले व कृषी अधिकाऱ्यांसह अन्य उपस्थित होते.