पीक नुकसानभरपाई फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्यांंचे हालचहाल

0
1143
Google search engine
Google search engine

आज शेवटची मुदत असल्यामुळे तालुका कृषी कार्यालयात लांबच लांब रांग

मुदतवाढ देण्याची शेतकरी वर्गाकडून मागणी

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

परळी दि.०१ -जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे जरी आदेश दिले असले तरी शासनाकडून अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याचे अत्यंत क्रूरपणे हाल केले जात आहेत. खरीप हंगाम २०१९ मधील ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे त्यांनी कृषी कार्यालयामध्ये झालेल्या नुकसानीचे  पुरावे केवळ 72 तासाच्या आत सादर करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आलेले होते. पण दिवाळीच्या सुट्यांमुळे कृषी कार्यालय बंद असल्यामुळे  ही नुकसानभरपाई संबंधित माहीत सर्व शेतकरिवर्गाकडे वेळेवर पोहचली नाही आणि आज शेवटच्या काही तासांमध्ये आपल्या शेतकरी राजाची सगळीकडून पळापळ उडाली. तालुका कृषी अधिकारी कार्यालय परळी वै येथे पीक नुकसानभरपाई फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख असल्यामुळे शेतकऱ्यांची अशी रांग लागली होती. शेतकऱ्यांचे होणारे हाल आणि जे  शेतकरी यापासून वंचित राहिले आहेत त्यांना पण नुकसान भरपाईचा फायदा होईल व कोणताच शेतकरी या पासून वंचित राहणार नाही या करिता शेतकऱ्यांच्या हाल आपेष्ठा पाहता सर्व शेतकरी वर्गाकडून ही अंतिम मुदत वाढवून मिळावी अशी मागणी होत आहे. तर आता प्रशासन या मागणीला किती गांभीर्याने घेऊन शेतकरी राज्याची होणारी हेळसांड कश्या प्रकारे थांबवले हे पाहता येईल.