आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतला मोर्शी वरुड तालुक्यातील सर्वच विभागाचा आढावा ! 

1964
जाहिरात

रुपेश वाळके विशेष प्रतिनिधी /

मोर्शी विधानसभा मतदार संघाचे नव निर्वाचित आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांची आढावा मिटिंग मोर्शी येथील उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये घेण्यात आली यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत उप विभागीय अधिकारी नितीन हिंगोले , मोर्शी वरुड तालुक्यातील तहसीलदार , कृषी अधिकारी , नगर परिषदेचे मुख्याधिकारी , गट विकास अधिकारी यांच्यासह सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते .

यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील सर्वच विभागाचा आढावा घेऊन मतदार संघातील समस्या जाणून घेतल्या सोबतच मोर्शी येथे महापुरामुळे नुकसान झालेल्या भागातील नागरिकांना तात्काळ मदत वितरित करण्याचे निर्देश देऊन कृषी विभाग , आरोग्य विभाग , पंचायत समिती यासह आदी विभागाचा आढावा घेऊन नागरिकांच्या समस्या तात्काळ सवडविण्याचे निर्देश यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले .

यावेळी आढावा बैठकीला आमदार देवेंद्र भुयार , उप विभागीय अधिकारी नितीन हिंगोले  , जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी , नगरसेवक डॉ प्रदीप कुऱ्हाडे , दिलीप गवई , नितीन पन्नासे , संदीप रोडे , नाईम खान , नाना देशमुख , नरेंद्र जिचकार , विनोद ढवळे , राजू साठवणे , पिंटू महल्ले , पंकज विधळे , निलेश रोडे , अनिल खांडेकर , रामा कळंबे , नितीन लुंगे , मोरेश्वर गुडधे, विलास ठाकरे , रुपेश मेश्राम , शेरा खान , यांच्यासह काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पादाधिकारी यांच्यासह मोर्शी वरुड तालुक्यातील सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते .

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।