समाजसेवेचा वसा सतत सुरू मेळघाट मध्ये जीवणाआवश्यक वस्तूचे वाटप पाच वर्षे पासून सुरू आहे परंपरा.

0
875

समाजसेवेचा वसा सतत सुरू मेळघाट मध्ये जीवणाआवश्यक वस्तूचे वाटप
पाच वर्षे पासून सुरू आहे परंपरा.

चांदुर बाजार :-

स्थानिक चांदुर बाजार येथील स्व.संजय कटारिया मेमोरियल ट्रस्ट आणि जगदंब पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कडपे,फराळ,पुस्तक,अंथरून,ब्यालनकेत किराणा चे वाटप करण्याची सतत 5 वर्षे पासून हा उपक्रम सुरू आहे.यामध्ये अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील अति दुर्गम भागात जाऊन त्या ठिकाणी राहत असलेल्या आनि कस तरी आपले जीवन जगणाऱ्या नागरिकांना,महिलांना,आणि मुलांना आवश्यकता नुसार साहित्य वाटप करण्यात येते.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मेळघाट मधील माखला,केली,अनेक असे लहान खेडे गावात जाऊन सुमारे 100 ते 150 अंतर पार करून स्व संजय कटारिया मेमोरियल ट्रस्ट आणि जगदंब पब्लिक स्कूल या चे आयोजन करीत असते त्यांना या उपक्रम साठी चांदुर बाजार तसेच ग्रामिण भागातील अनेक नागरिकांची तसेच त्यांच्या मित्र परिवाराचे सहकार्य लाभले.आणि आदिवासी बांधव याच्या चेहऱ्यावर येणारे हसू एक वेगळाच आनंद देत असल्याचे जगदंब पब्लिक स्कूल अध्यक्ष विनोद कोरडे यांनी दै.दिव्य मराठी शी बोलताना सांगितले.

तहान भूक विसरून या संस्थे द्वारे मागील 5 वर्षी पासून ही परंपरा सुरू आहे तरी या मध्ये स्व.संजय कटारिया मेमोरियल ट्रस्ट अध्यक्ष मनोज कटारिया,जगदंब पब्लिक स्कूल अध्यक्ष विनोद कोरडे,विदर्भातील गझलकार नितीन देशमुख, मनीष एकलारे,प्रतीक काळे,आनंद अहिर,अतुल रघुवंशी,मुरली माकोडे,दत्तात्रय कितुकले, राजेश लेंडे,अभय देशमुख, उदय देशमुख ,किशोर अर्डक,सोनू भट्ट,सतीश गुजरकर,विनोद बंड, आणि बादल डकरे याचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया:-
स्वतःसाठी सर्वच जगतात मात्र इतरांसाठी जगणे याला खरे आयुष्य म्हणतात आणि ही जाणीव मला गाडगेबाबा, माई सिंधूताई सपकाळ याच्या कडून मिळाली.
1)विनोद कोरडे

आम्ही मागील 5 वर्ष पासून हा उपक्रम हाती घेतला आहे यासाठी आम्हला चांदुर बाजार मधील नागरिक याचे सहकार्य लाभले.तसेच ही परंपरा नेहमी आमच्या कडून घडो हीच प्रार्थना.
2)मनोज कटारिया

हे सगळे लोक दूर वरून येऊन आम्हला जीवन आवश्यक वस्तूचे वाटप करतात,महिलांना साडी,मुलाना कपडे स्वेटर ,चिवडा,किराणा देताना आम्ही खरच यांचे ऋणी आहे.
हरी बायस्कर केली रहिवासी मेळघाट