न्युज प्रिंट पेपरवरील जीएसटी रद्द करावा – असोसिएशन स्मॉल अँण्ड मिडियम न्युज पेपर ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीत मागणी

135
जाहिरात

कराड (प्रतिनिधी ) – लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि संघटनेचे कार्य अविरत चालू राहावे यासाठी असोसिएशन स्मॉल अॅण्ड मिडियम न्युज पेपर ऑफ इंडिया नेहमीच प्रयत्नशील आहे. असे बैठकीला संबोधित करताना राष्ट्रीय अध्यक्ष केशव दत्त चंदोला म्हणाले.

लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या असोसिएशनच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मॅकबार्टच्या मध्यवर्ती कार्यालयात झाली. या बैठकीत छोट्या व मध्यम वर्तमानपत्रातील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला संघटनेचे राष्ट्रीय सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. राजस्थानचे अशोक चतुर्वेदी यांनी विषयपत्रिका वाचून प्रत्येक सदस्याची याबाबत सहमती घेऊन अहवाल सादर करण्याचे आवाहन केले.

बैठकीत जीएसटीचा मुद्दा उपस्थित करीत उत्तर प्रदेशचे अध्यक्ष शामसिंग पंवार म्हणाले की, जीएसटी वृत्तपत्राच्या कागदावरुन काढून टाकले जावे, छोट्या व मध्यम वृत्तपत्रांच्या कागद खरेदीवर लावण्यात आलेला जीएसटी रद्द करण्यांत यावा याबाबत केंद्र शासन विचार करीत आहे. याबाबतची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान याबाबतची मागणी देशातील प्रत्येक राज्यातून केंद्र शासनाकडे करणे आवश्यक आहे. अनेक राज्यातून जीएसटी रद्द करण्याची मागणी आल्यानंतर केंद्र शासन यावर विचार करून नक्कीच कागदासाठी दयावा लागणारा जीएसटी रद्द होईल अशी आशा उत्तर प्रदेशचे अध्यक्ष शामसिंग पंवार व्यक्त केली.

यावर सर्व सदस्यांनी सहमती दर्शविली आणि लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या जीएसटीबाबात केंद्र सरकारकडे मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यूज प्रिंट पेपरमधून जीएसटी काढून टाकला पाहिजे. अशी मागणी करणेत आली आहे. प्रारंभी प्रास्तविक संघटनेचे सचिव लाँगसिंग तेरान यांनी केले. मागील सभेचे इतिवृत्त वाचुन कायम करणेत आले. असोसिएशन स्मॉल अॅण्ड मिडियम न्युज पेपर ऑफ इंडिया संघटनेचे देशभरातील राष्ट्रीय सदस्यांनी राज्यनिहाय अहवाल सादर केला.

कोषाध्यक्ष भगवती चांदोला, रबीरथ, ओरिसाचे भजाराम, के वेंकट रेड्डी, कमल कुमार, के परशुराम, एस कोंडलराव, एम अरुणा, महाराष्ट्रातील प्रवीण पाटील, गोरख तावरे, अजिंक्य म्हात्रे, राजस्थानचे अशोक चतुर्वेदी, डॉ. अनंत शर्मा , गुजरातमधील शंकर कटिरा, जे मणियार, मयूर बोरिया, धन रजनी, आसाममधील लांगसिंग तेरान, अतुल दीक्षित, उमा मिश्रा, गगन श्रीवास्तव, केके साहू, सुनील साहू, यूपीचे रशीद, राजीव मिश्रा, उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।