उस्मानाबादेत मनसे बँकफुटवर

294
जाहिरात
Slider

उस्मानाबाद / हुकमत मुलाणी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तुळजापूर विधानसभेसाठी मनसेकडून प्रशांत नवगीरे यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती.या निवडणूकीत त्यांचा दारुण पराभव झाला.त्यामुळे नवागीरे यांनी राष्ट्ररवादीत प्रवेश केला असल्याचा प्राथमीक अंदाज आहे.परंतू मनसे बँकफुटवर आले असल्याची जिल्ह्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

नवगीरे यांनी ता.३.११.१९ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्यासह मनसेच्या पदाधिकार्यांनी मुंबई येथे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ गटनेते मा.अजीत (दादा) पवार व प्रदेशाध्यक्ष

मा.जयंत पाटील यांच्या हस्ते,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहिर प्रवेश केला.
प्रशांत नवगिरे यांचेसोबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव,उपजिल्हाध्यक्ष मल्लिकार्जून कुंभार,मयूर गाढवे,राहूल गायकवाड, मनसे तुळजापूर तालूकाध्यक्ष धनाजी साठे,उपतालूकाध्यक्ष अविनाश कांबळे, मनविसे तालुकाध्यक्ष रोहित दळवी या पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार व जि.प.सदस्य महेंद्र (काका)धुरगुडे उपस्थित होते.या प्रवेशामुळे आता या तुळजापूर विधानसभा मतदार संघात मनसेचे नेत्रत्व करणारे नवगीरे यांनी राष्ट्ररवादीत प्रवेशा केल्यामुळे मनसे सैनिकांना मोठा धक्का बसला आहे. तसेच या विधानसभेत मनसेने उस्मानाबाद कळंब विधानसभेसाठी उमेदवारी दिली नसल्यामुळे या मतदार संघातही मनसेची ताकत कमी होत चालली असल्याचीही चर्चा सुरु आहे. मध्यंतरी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी हटके अंदोलने करुन मनसेला चर्चेत ठेवले होते. तसेच नुकत्याच उस्मानाबाद कळंब मतदार संघातील मनसेच्या येरमाळा येथील तालुका पदाधीकारी यांनी वंचीतला पाठिंबा दिला होता अशीही चर्चा आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातही मनसे बँकफुटवर आले असल्याची उलट सुलट चर्चा सुरु आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।