आकोटात मध्यस्थी वधू-वर परिचय मेळाव्याला उत्फूर्त प्रतिसाद – राज्यभरातुन ४३७ युवक-युवतींची नोंदणी

0
1562
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके :-

श्रद्धासागर येथे आयोजित मध्यस्थी वधू-वर परिचय मेळाव्याला राज्यातून मोठ्या संख्येने विवाह इच्छूक युवक-युवती व त्यांचे पालकांनी हजेरी लावून उत्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी अध्यक्षस्थानीअकोला मराठा मंडळाचे अध्यक्ष डाॕ रणजित सपकाळ हे होते तसेच मंचावर ईतर गणमान्यांची उपस्थिती होती.डाॕ रणजित सपकाळ यांनी अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना
विवाह हा एक संस्कार आहे.भारतीय संस्कृती व परंपरेने दिलेला हा संस्कारातूनच कुटुंब समाज घडत असतो.त्यातून सदृढ राष्ट्र निर्माण होते.विवाह संस्कार रुजविण्यासाठी गुरुवर्य वासुदेव महाराजांनी आयुष्यभर प्रबोधन केले तोच वारसा मध्यस्थी मंडळ पुढे निष्ठेने चालवित आहे.मध्यस्थी कार्य समाजाभिमुख झाले आहे असे प्रतिपादन केले.

मध्यस्थी वधू-वर सुचक मंडळ आकोट द्वारा आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात डाॕ.रणजित सपकाळ बोलत होते.अध्यक्षस्थानी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महाराज महल्ले होते.याप्रसंगी समाज सुधारक जेष्ठ नेते महादेवराव भुईभार,सहकार नेते रमेश हिंगणकर ,जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश महासचिव पुनम पारसकर ,दर्यापूरचे दिनकरराव गायगोले, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोकराव अमानकर,डाॕ.अमोल रावणकार,सुधीर ढोणे,कविवर्य निलेश म्हसाये ,वैभव टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुनम पारसकर यांनी सामाजिक सद्यःस्थितीवर प्रकाश टाकून उपस्थितांचे उद् बोधन केले.मुला मुलींनी भविष्यातील स्वप्न जरुर बघावे परंतू वास्तवाचे भान ठेवावे. अपेक्षा आणि महत्वाकांक्षेच्या ओझ्याखाली कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाल्याची खंत त्यांनी आपल्या ओजस्वी भाषणात व्यक्त केली. गुरुमाऊली’ वासुदेव महाराजांचे विचार आचरणात आणून विवाहातील अवडंबर थांबले पाहीजेत.अनाठायी खर्च,मुहूर्त,कर्मकांड आणि मोठेपणाच्या आहारी न जाता आदर्श व सामुहिक विवाह घडवून आणा.असा हितोपदेश समाजसुधारक महादेवराव भुईभार यांनी केला.यावेळी रमेश हिंगणकर ,प्राचार्य वसंतराव घिवे.बाळकृष्ण आमले यांची समायोचित भाषणे झालीत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव सुरेशदादा कराळे यांनी केले.मध्यस्थी मंडळाच्या कार्याचा आढावा देत अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे यांनी समाज बांधवांशी संवाद साधला.

परिचय सत्रात राज्यातून आलेल्या विविध स्तरातील युवक-युवतींनी आपला परिचय दिला.मंडळाकडे ४३७ युवक-युवतींची नोंदणी झाली.

कार्यक्रमाचे संचालन सौ.ज्योतीताई कुकडे,व सौ.शोभाताई म्हैसणे यांनी तर आभार प्रदर्शन मंडळाचे कोषाध्यक्ष जयकृष्ण वाकोडे यांनी केले.

मेळाव्याला सहकार नेते मोहनरव जायले,शंकरराव चौधरी,शेषराव वसु डाॕ.राजेश नागमते,कॕप्टन सुनिल डोबाळे, राजदत्त मानकर,संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजुरकर,सचिव रविंद्र वानखडे ,सदाशिवराव पोटे, दिलिपराव हरणे,प्राचार्य गजानन चोपडे,महादेवराव सावरकर,नागोराव वानखडे,भाष्करराव डिक्कर,मधुकरराव पुंडकर,सौ.वृंदाताई मंगळे प्रा.साहेबराव मंगळे,रामदास मंगळे,गजानन वालसिंगे
प्रकाशराव राउत.कारंजा . अमृत पाटील वाघ. खामगाव . अशोकराव बुरघाटे . यवतमाळ.बाळासाहेब रावनकर अकोला.ज्ञानदेवराव वनारे अकोला. पाथरे सर दर्यापुर .. बाळासाहेब रावनकर अकोला.डी.ओ.म्हैसणे,
प्रकाश फुके,श्रीराम झापे,विठ्ठल मंगळे,श्रीहरी मंगळे,बाबुराव देशमुख ,माधवराव ताथोड,विनायकराव कुकडे,सुधाकरराव हिंगणकर ,रत्नाकर रेळे,बंडू कुलट,गजानन महल्ले,राममुर्ती वालसिंगे,मनोज लोडम, पुणे,अमरावती,यवतमाळ,बुलढाणा कारंजा,मलाकापूर नांदुरा,खामगांव बुलढाणा,कारंजा,मंगरुळ,परतवाडा,अंजनगांव,दर्यापूर ,तेल्हारा येथील मंडळाचे समन्वयक व कार्यकर्ते तथा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.