“अ” स्वच्छतेच्या बाबतीत शेगांव नगर परिषदची उच्चांक भरारी?

0
1713
Google search engine
Google search engine

जन प्रतिनिधी तथा अधिकारी वर्गाना काम शून्य पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे ही शेगाव शहरवाशी यांत अनोखी चर्चा ?

शेगांव :- मागील बऱ्याच महिन्यापासून संत नागरी शेगांव मध्ये पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे शहरात झालेल्या अ स्वच्छतेमुळे शेगाव शहराची अनोखी ओळख निर्माण झाली आहे ज्या प्रमाणे गरजू लोक शासनाने बांधून दिलेल्या फूटपाथ वर झोपतात तसाच काहीसा कार्यप्रकार शेगांवच्या नगरपरिषदेने बसवलेल्या पेव्हरसचा वापर चक्क घाण कचरा फेकण्यासाठी केला जात आहे. शेगावला आलेला विकास आराखडा आणि त्यात कोट्यवधी रुपयांनी विकसित केलेले रस्ते ( पेव्हरस ) यांचा उपयोग होत असून ते नेमके आहेत कश्यासाठी असा प्रश्नच नागरिकांना पडला आहे.

जनतेने किती तक्रारी केल्यात ज्यांनी लोकांना समस्यां सोडविण्यासाठी मतदान रुपी आशीर्वाद मागितला व जनतेने ज्यांच्या वर विश्वास टाकला असे नगर सेवक आज आपल्याच धुंदीत मग्न असल्याचे दिसत आहे महत्त्वाचं म्हणजे विरोधक सत्ताधऱ्याच्या खिश्यात आहे की काय ? असा तर जनमानसात विरांगुळतील चर्चेचा विषय ठरला आहे.

जेवढे सांगली, सातारा कोल्हापूर या भागात जेवढे पाणी आहे तेव्हढीच घाण कचरा शहर व परिसरात दिसून येतो हे पक्क.

ऑगस्त २०१४ मध्ये देशाच्या पंतप्रधानांनी स्वच्छते विषयी क्रांति घडून आणली. परंतु यांचं क्रांतीची जोत मात्र त्याच नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी विजवली का ? आणि त्याच नेत्यांना हात भार लावण्यास अधिकारी वर्ग पण मागे राहिला नाही अर्थात् काम शून्य झालेले दिसते ! या सर्व गोष्टी साठी पैसा येतो पण हा जातो कुठे? कुणाचं ठाऊक !

हे परमेश्वरा कुठे नेऊन ठेवला रे शेगांव माझे !

असे चित्र असन्याला कारणीभूत असलेल्या नेत्यांना आणि अधिकारी वर्गाला का सन्मानित करण्यात येऊ नये असा प्रश्न जनता विचारत आहे तशी चर्चा जागोजागी होतांना दिसते आहे !