खाकी वर्दीतील दर्दी माणूस ; रविंद्र कचरे

232
जाहिरात
Slider

खाकी वर्दीतील दर्दी माणूस ; रविंद्र धोंडीराम कचरे.

लासोना / प्रतिनीधी

एरवी समाजात एक प्रचलित म्हण आहे की, शहाण्याने पोलीस स्टेशनची पायरी चढु नये”.सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांविषयी एकप्रकारची भीती असते.सरळमार्गी लोक तर पोलिसांशी दोस्तीही नको,अनं दुश्मनीही नको !म्हणुन चार हात लांब रहाणेचं पसंत करतात.
परंतु याला अपवाद ठरतात ते पोलीस मुख्यालयात चालक पदावर कार्यरत असणारे हेकॉ.रविंद्र धोंडीराम कचरे बक्कल नंबर ३९१.गेल्या वर्षी पासुन त्यांनी एक व्रत घेतले.बेंबळी पोलीस स्टेशनला नेमणूक असताना बेंबळी हद्दीतील गावांतुन पोलीस पाटलांच्या मदतीने गरीबातील गरीब लोकांचा शोध घेऊन १७ कुटूंबांना दिपावळी फराळाला लागणारा संपूर्ण किराणा सामान,सुगंधी तेल,मोती साबण व आकाश कंदील व भाऊबीजेची साडी घेऊन दिली.व गोर-गरीबांच्या घरात याच पोलीसांमुळे दिपावळी साजरी झाली.
यावर्षी ही ही परंपरा कायम ठेवत गोर-गरीबांची दिपावळी गोड केली. समाजात पैशाने अती श्रीमंत लोक आहेत,परंतु मनाने श्रीमंत असणारी लोक फार कमी प्रमाणात आढळतात.त्यापैकीचं हे एक वर्दीतील दर्दी हेकॉ.रविंद्र धोंडीराम कचरे.व प्रसिद्धी पासुन चार हात लांब राहत,कुठलाही गाजावाजा न करता हे कार्य करत आहेत.व आणखी एक वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे आपल्या पगारातुन ५ दिवसांचा पगारही कोल्हापुर-सांगली-सातारा येथील पुरग्रस्तांसाठी दिला.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।