जागजी येथील द्राक्ष बागेची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

182
जाहिरात
Slider

जागजी येथील द्राक्ष बागेची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

स्मानाबाद – ( ता.६ /११/२०१९) सतत पडणाऱ्या पावसाने जिल्हाभरातील शेतकंर्यावर वाईट परिस्थिती निर्माण केली. जिल्ह्यातील द्राक्ष शेतकंरी पुर्णपणे उदवस्थ झाला.या शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेण्यासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे उस्मानाबाद तालुक्यातील जागजी या गावात आल्या. त्यांनी प्रत्यक्ष द्राक्ष , कांदा या पिकांची पाहणी करून येथील शेतकऱ्यांना दिलासा दिला.अंधारात सुद्धा स्वताः जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी केल्याने शेतकंरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.
जागजी गावामध्ये जवळपास 200 एकर द्राक्ष बाग आहे. आक्टोबरची फळछाटणी घेतलेल्या बागा पुर्णपणे या परतीच्या पावसाने डावनी , करपा , घडाची होणारी कुज आणि गळ यांने येथील बागाईतदाराचे जवळपास दोन कोटी रुपयाचे नुकसान झाले. संध्याकाळच्या वेळी ही जिल्हाधिकारी यांनी चिखलात शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेची पाहणी करुन सर्वांना दिलासा दिला. त्याच बरोबर कृषी विभागाला ही शेतकऱ्यांचे लेखी निवेदन घेऊन पंचनामे करा असे सांगितले .यावेळी आप्पासाहेब पाटील , मधुकर सावंत,दिपक सावंत, विजय हाऊळ, कल्याण सावंत, विकास सावंत, राजाभाऊ देशमुख , बिरु भालेकर , दादा सावंत, यावेळी तहसीलदार गणेश माळी, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव,कृषी सहाय्यक सचिन मगर, मंडळअधिकारी श्री कुलकर्णी , तलाठी श्री. कासराळे,श्री. गायकवाड , सोमनाथ गवळी यांची उपस्थिती होती.
फोटो आहे….
जागजी येथील बागेची पाहणी करताना जिल्हाधिकारी.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।