ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन बनले शोभेची वस्तू स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यवाही,तर अधिकारी मात्र चुप्पी

321
जाहिरात

ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन बनले शोभेची वस्तू
स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यवाही,तर अधिकारी मात्र चुप्पी

प्रतिनिधी :-

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर लागून असलेले ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहे .यामध्ये अवैध सागवान तस्करी, अवैध गावठी दारू,अवैध जनावर वाहतूक सुरू आहे तर गावातच मोठ्या प्रमाणात वरली मटका,गौण खनिज वाहतूक सुरू आहे.तर या ठिकाणी असलेले पोलीस अधिकारी हे फक्त नावालाच पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याचे दिसत आहे.

या आधी शुद्ध अमरावती स्थनिक गुन्हे शाखेच्या टीम ने अनेक वेळा ब्राह्मण वाडा पोलीस स्टेशन हद्दीत कार्यवाही केल्या. त्यामुळे कुंपण शेत गिळत तर नाही अशी अवस्था ब्राम्हणवाडा पोलीस स्टेशन ची झाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण याना दि.05/11/19 रोजी पोलीस स्टेशन ब्रा. वाडा (थडी) ग्राम घाटलाडकी येथे अवैदय गावठी दारू विक्री होत आहे या मिळालेल्या गोपनीय माहिती वरून अवैदय गावठी दारू विक्री रेड केला असता अवैदय (गावठी)हातभट्टीची दारू ग्राम घाटलाडकी येथे मिळून आली. गावठी हातभट्टीची दारू 20 लिटर की.अं. 3,000 रु. चा माल मिळून आल्याने आरोपी बाबुराव ब्राह्मणे रा. घाटलाडकी यांचे विरुद्ध कारवाई करण्यात आली.सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी व अप्पर पोलीस अधीक्षक ग्रामीण शाम घूगे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील किनगे, सपोनि मुकुंद एस कवाडे, हेड कॉस्टबल त्र्यंबक मनोहर नाईक पोलीस कॉस्टबल गजेंद्र ठाकरे, योगेश सांभारे, प्रमोद खर्चे, पोलिस कॉस्टबल प्रवीण अंबाडकर, चालक सहाय्यक उप पोलीस निरीक्षक गणेश मांडोकर यांनी कारवाई केली.

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।