आगळीवेगळी दिवाळी आणि भाऊबीज साजरी. • जनजागृतीनंतर स्त्रीयांच्या डोळ्यात तरळले अश्रू.

0
683
Google search engine
Google search engine

आगळीवेगळी दिवाळी आणि भाऊबीज साजरी.
• जनजागृतीनंतर स्त्रीयांच्या डोळ्यात तरळले अश्रू.

लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशन
समाज कार्य महाविद्यालय बडनेरा
डाँ. पंजाबराव देशमुख विधि महाविद्यालय यांचा उपक्रम

दि. ४/११/२०१९ रोजी सकाळी १० वाजता माजरी मसला या छोट्याश्या गावी लिगल स्क्वेअर समाज कार्य महाविद्यालय व डाँ. पं. दे. विधी महाविद्यालय यांच्या तर्फे आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. आज दारू मुळे असंख्य संसार उध्वस्त झाले हे पुर्ण जगाला अवगत आहे पण तरीही किती तरी पुरुष आणि तरुण वर्ग दारूच्या नकळत विळख्यात अडकून आपल्या तसेच आपल्या कुटुंबियांच्या आयुष्याची राखरांगोळी करत आहे. याचाच मागोवा घेत लिगल स्क्वेअर च्या सदस्यांनी व्यसन एक कौटुंबिक कलह या विषयावर संशोधनात्मक पद्धतीने पथनाट्य सादर केले. पथनाट्या मधे दारू मुळे होणाऱ्या अपायाला अनुसरण ५ दृष्याचा समावेश होता. ज्यामध्ये मुख्यत: घरेलू हिंसाचार, बेरोजगारी, हुंडाबळी, गुन्हेगारी वृत्ती अश्या अनेक घटनांचा समावेश करण्यात आला होता. पथनाट्याचा वेळी सर्व प्रेक्षकांनी विषयाची गांभीर्याता लक्षात घेऊन उत्तम प्रतिसाद दिला. पथनाट्या नंतर गावातील समस्यावर दिलखुलास पणे चर्चा करण्यात आली. यावेळी महिलांनी दारु बद्दल रोषात्मक मत मांडले. व राज्यात लवकरात लवकर दारु बंदी व्हावी हि मागणीही करण्यात आली. आपले मत मांडते वेळी महिलाच्या भावना अनावरण होऊन त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू तरडले. दिवाळी ला सर्वांना नविन कपडे तसेच फराळ द्यायच्या उद्देशांने जनजागृती च्या कार्यक्रमानंतर दिवाळी निमित्त सर्व स्त्रियांना साड्या तसेच पुरुषांना कपड्याचे लहान मुलांना शालेपयोगी वस्तूचे तसेच फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाज कार्य महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. दिलीप काळे, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप चौधरी, लिगल स्क्वेअर चे संस्थापक अध्यक्ष सुरज जामठे तसेच सचिव प्रियंता राजनेकर हे लाभले होते त्याच बरोबर या कार्यक्रमासाठी लिगल स्क्वेअर चे सहसचिव आदित्य सतके, आशिष मेतकर, आचल पडोळे, स्नेहल पाटिल कृतिका मोहोड, गौरव जामठे, श्रद्धा कोम्बे, अनिरुद्ध सतके, निखिल बिलवे, रोषन नागले, प्रणाली निकोसे, प्रज्ञा मेश्राम, मयुरी चुडे, हर्षाली चुरे, श्रुती वानखडे दत्ता मुदगळे ऋित्विजा कलासे आदींनी परिश्रम घेतले.