कागदाच्या अटी कशाला? हेक्टरी ५० हजार अनुदान द्या – मधुकरराव चव्हाण

0
901
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळीमुळे पिके आडवी झाली असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्यामुळे खरीप ही गेले, आणि शेतीच्या मशागतीसाठी दिड दोन महिने लागत असल्यामुळे रब्बीचे पिके पण गेली, त्यामुळे सरकार ने कागदपत्र न मागता सरसगट शेतक-यांना मदत करावी, असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये मध्ये व्यक्त केले.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दुपारी दिड वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पाटिल , लक्ष्मण सरडे, राजेंद्र शेरखाने, सज्जन सालुंके, सय्यद खलिल, अग्निवेश शिंदे, दर्शन कोळगे, उपस्थित होते.पत्रकार परिषदेत माहिती देताना मधुकरराव चव्हाण यांनी शेतात पाणी साचल्यामुळे कांदा जाग्यावर सडला आहे.त्यामुळे उग्र वास पसरला आहे.द्राक्ष बाग, सोयाबीन, मक, उसाचा मुळवा अतिपाण्यामुळे कुजला आहे त्यामुळे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.अति पावसामुळे शेतात तण वाढले आहे. कॉंग्रेस राजवटीमध्ये ज्या प्रमाणे शेतक-यांना तण काढण्यास अनुदान दिले होते. त्या पद्धतीने तण काढण्यास सरकार ने अनुदान द्यावे, त्याच प्रमाणे ५० हजार रूपये हेक्टरी शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, राज्यात सध्या कांही बॅंकेची दिवाळखोरी निघाली असून, आर्थिक मंदीमुळे बेरोजगारी वाढली आहे.त्या सर्व प्रकाराचा परिणाम शेतीवर झाल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत.याबाबत सरकार ने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हाधिका-यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
बसवराज पाटील गटाची गैरहाजरी
यावेळी पत्रकारांनी बसवराज पाटील या आंदोलन सहभागी झाले नाहीत का या संदर्भात मधुकरराव चव्हाण यांना विचारण्यात आले असता, त्यांनी पाटील हे तातडीने मुंबईला कामानिमित्त गेल्याचे सांगितले.पत्रकारांनी शरण पाटील, प्रकाश आष्टे हे पण दिसत नसल्याचे सांगताच सगळ्यांच्या नजरा इकडे तिकडे वळल्या.