सुप्रीम कोर्ट देणार उदयाला निकाल :-पिटीआय देशातील जनतेचे लक्ष निकालकडे

102
जाहिरात
Slider

सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देणार आहे. उद्या १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.  त्यामुळे संबंध भारताचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. ययासाठी केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली व मुंबईत अतिदक्षता बाळगण्यात येत आहे. महाराष्ट्रातही पोलीस, धडक कृती दले, रेल्वे पोलीस, गृहरक्षक दल तसेच राज्य राखीव दल यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र मधील रजेवरील पोलीस व सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना तत्काळ कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे आणि रेल्वे स्थानकांवर २४ तास पुरेसा उजेड ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही नीट चालत आहेत का, हे पाहून प्रसंगी ते ताबडतोबीने दुरुस्त करून घेण्यास सांगण्यात आले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।