आसुबाई देवीच्या यात्रेस मोठ्या उत्साहात सुरुवात

0
818

उद्या कुस्त्याची रंगणार दंगल, विविध कार्यक्रमाची मेजवानी

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

दि. १२ – त्रिपुरारी पौर्णिमेस परळी तालुक्यातील मांडेखेल तेथे मोठ्या उत्साहात रेणुकामातेचे आठवे शक्तीपीठ असलेल्या आसुबाई माता यात्रेस सुरुवात झाली. दि 12 ते 13 नोव्हेंबर दरम्यान यात्रा महोत्सव साजरा करण्यात येत आहे.दि 13 नोव्हेंबर रोजी भव्य कुस्त्याची दंगलसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी भाविक भक्तांना लुटता येणार असल्याची माहिती गावकर्यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. आसुबाई माता ही रेणुकामाता देवीचे आठवे शकतीपीठ भाविक भक्तांची धारणा आहे.मोठ्या संख्येने भाविक भक्त देवीचे दर्शन घेऊन धन्य होतात. देवी नवसाला पावणारी तसेच जागृत शकतीपीठ असल्याने अनेक नवस फेडले जातात.

दि 12 नोहे रोजी देविचा छबिना तसेच शोभेची दारू प्रथेप्रमाणे रात्री होणार त्यानंतर भीमराव निळोबा काळे यांच्या जय भवानी पार्टीचा वाघ्या मुरुळीचा कार्यक्रम आणि पारंपरिक गोंधळी गीतांचा कार्यक्रम होणार असून दि 13 नोहें रोजी दुपारी 1 वाजता भव्य कुस्त्याची दंगल रंगणार आहे.कुस्त्यामध्ये अनेक मानाच्या कुस्त्या होतात .गेल्या वर्षी प्रा.टी. पी. मुंडे सर यांच्या हस्ते 7001 ची त्यांचे वडील कै. पाटलोबा मानाजी मुंडे यांच्या स्मानार्थ शेवटची कुस्ती झाली व ती प्रथेप्रमाणे अविरत चालू आहे .जिह्यातील तसेच पचंक्रोशीतील मल्लानी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गावकरी मोठा सण म्हणून यात्रा महोत्सव साजरा करतात .बाहेरून अनेक भाविक भक्त येतात. या यात्रा महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन गावकर्यांनी केले आहे.