पुणे येथे मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला “शाईनींग स्टार ऑफ महाराष्ट्र” मध्ये मिळविले दोन नामांकन

0
437
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे –
एक काळ होता की मॉडेलिंग याक्षेत्रावर ‘महिला राज’ होते. पण अलिकडच्या काळात पुरूषही कौशल्याने रॅम्पवर चालताना दिसतात. विशेष म्हणजे यामध्ये आता ग्रामिण भागातील मुले सुध्दा मागे राहिलेले नाही. पुणे येथे आयोजित मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला असुन “शाईनींग स्टार ऑफ महाराष्ट्र” या स्पर्धेत दोन नामांकन मिळविले आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील शेतकरी कुटुंबातील युवक सागर दादाराव क्षिरसागर याला मॉडेलिंगमध्ये करीअर करण्याची इच्छा झाल्यामुळे तो या क्षेत्रात अनेक दिवसापासुन चांगलीच मेहनत करीत होता. अशातच नुकतेच पुणे येथे शौर्या फाऊंडेशनतर्फे “शाईनींग स्टार ऑफ महाराष्ट्र” या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये सागर क्षिरसागर यानेही सहभाग घेतला असता आपल्या मॉडेलिंग कलाचे सादरीकरण प्रेक्षकांसमोर केले. या स्पर्धेत त्याने सुरूवातीला टॉप १० मध्ये जागा मिळविली व नंतर “बेस्ट पर्सनॅलिटी” व “मिस्टर कॉन्फीडेन्ट” हे दोन नामांकन एकट्यानेच मिळविले. यामुळे ग्रामिण भागातील युवक राज्यपातळीवर चमकला असुन घुईखेड गावाचे नाव रोशन केले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.