४५ वर्षीय व्यक्तीची पंपहाऊस वरील झाडाला गळफास लावुन आत्महत्या – आत्महत्येचे कारण अस्पष्ट

0
1126
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे –
     चांदूर रेल्वे शहरातील डांगरीपुरा परिसरातील ४५ वर्षीय एका व्यक्तीची नगर परिषदच्या पंपहाऊस वरील झाडाला गळफास लावुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. १२) दुपारी ३.१० वाजताच्या दरम्यान घडली.
    संजय किसनराव सुर्यवंशी (वय ४५) रा. डांगरीपुरा असे मृतकाचे नाव आहे. तो मजुरीचे काम करत होता. मंगळवारी दुपारी सुध्दा कामावरून घरी आला. व घरून निघुन जवळच असलेल्या पंपहाऊसवर गेला. तेथील भिंतीवर चढून मोठ्या झाडाला गळफास लावुन जिवनयात्रा संपविली. ही आत्महत्या अमरावती बायपास रस्त्याच्या अगदी लगतच घडली. भरदुपारी व रस्त्याच्या कडेलाच आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर शवविच्छेदनाकरिता मृतदेह स्थानिक ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आला. मृतक संजय सुर्यवंशी यांच्यामागे आई, १ मुलगा, १ मुलगी असा आप्तपरिवार आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.