विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमली वरुर जऊळका नगरी – वै.श्री संत शिवराम महाराजांचे पुण्यस्मरणः

219
जाहिरात

कार्तिक सोहळा ‘याचि देही याचि डोळा’

आकोट:प्रतिनिधी
विदर्भाची पंढरी म्हणून सर्वदूर प्रसिध्द असलेल्या वै.श्री संत शिवराम महाराजांची पुण्यभूमी श्री क्षेत्र वरुर जऊळका येथे कार्तिक सोहळा भक्तीमय वातावणात पार पडला. श्रद्धा,भक्ती आणि ज्ञान अशा त्रिवेणी संगमात अवघे भाविक भक्त न्हाऊन गेलेत.’याचि देही ,याचि डोळा! स्वर्गी नाही हा सुख सोहळा !!’ याचा उत्कट अनुभव घेत गावोगांवचे भाविक भक्त धन्य झालेत.

कार्तिक महोत्सव व श्री संत शिवराम महाराज पुण्यतिथी निमित्त ह.भ प.वासुदेव महाराज खोले,ह.भ.प.एकनाथ महाराज,ह.भ.प बाळू महाराज पातोंड यांचे मार्गदर्शनाखाली
विविध धार्मिक ,आध्यात्मिक ,सांस्कृतिक ,
सामाजिक कार्यक्रम दरम्यान संपन्न झालेत..
या भक्ती सोहळ्याची पुर्णाहूती दिंडी सोहळ्याने झाली.या सोहळ्यात सहभागी गांवोगांच्या १५०दिंड्यांचे गावक-यांनी भावपूर्ण स्वागत केले.

कार्तिक सोहळ्याचा प्रारंभ महाभिषेकाने झाला .विठ्ठल मंदीरात संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.एकनाथ यांचे हस्ते ‘विठ्ठल’ महाभिषेक पार पडला

अवघी अवतरली पंढरी…

पालखी रथाची नगर प्रदक्षिणा व वारकरी दिंडी सोहळा पार पड दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला .या निमित्ताने वरुर नगर रांगोळ्या पताकांनी सुशोभीत करण्यात आले होते.
पुंडलिका वरदे…ज्ञानबा तुकारामाचा गजर, टाळमृदंगाचे ठेक्यावर नाचत गात गांवोगांवच्या शेकडो भजनी दिंड्या व हजारो भाविक सहभागी झाल्या होते. भजनी दिंड्यांतील भक्तीस्वरांनी अवघी दुमदुमली पंढरी असे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.दिंडी मार्गावर दुतर्फा भाविकांनी गर्दी करुन पालखीचे मनोभावे दर्शन घेतले.मार्गावर ठिकठिकाणी विविध सेवा मंडळ युवक व सामाजिक संस्थांनी दिंडीचे भावपूर्ण स्वागत दिंडीक-यासाठी करुन पाणी ,चहा,शरबत,मठ्ठा,व नास्त्यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली.श्रीचे पुजन व पुष्पवृष्टीने दिंडीचे भव्य स्वागत केले.

मुख्य मार्गावरुन मार्गक्रमण करीत स.११वाजता दिंडी विठ्ठल मंदीर येथे पोहोचताच भक्तगणांनी पुष्पवृष्टी करीत श्री चे उभे राहून स्वागत केले.

दरम्यान ह.भ.प.मधुकर महाराज ठाकरे यांचे सुश्राव्य काल्याचे किर्तन पार पडले

महाप्रसादाने या भक्ती सोहळ्याची सांगता झाली.हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

महोत्सवाचे आयोजनात सेवागट,युवक व महिला मंडळ व भक्तगणांनी अथक श्रम घेवून गुरुचरणी सेवा अर्पण केली.
————————-
अभूतपूर्व म्हणून ही भक्तीरंगाची उधळण अविस्मरणात राहील.असंख्य भाविकांनी विठुरायाचे श्रद्धापुर्वक दर्शन घेतले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।