मिराजी महाराज मठ संस्थानच्या काकडा आरती व कीर्तन सप्ताहाची आज सांगता

0
650
Google search engine
Google search engine

 

आकोटः प्रतीनिधी

मिराजी महाराज मठ संस्थान अकोली जहाँ. येथिल पुरातन तथा जवळजवळ शतकाच्या वर परंपरा असणाऱ्या परंपरागत काकडा आरती व कीर्तन सप्ताहाची उत्साहात सांगता होणार आहे.

अकोली जहाँ. येथिल सच्चिदानंद मिराजी महाराज मठ काकडा आरती मंडळ गेल्या अनेक वर्षापासुन वारकरी संस्कृतीतील या काकडा आरतीची परंपरा टीकवुन आहे.या निमित्य दि. ७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान श्रीमद भागवत कथा व कीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला होता.हभप श्री सोपान महाराज काळपांडे देवाची आळंदी यांच्या सुमधुर वाणीतुन कथावाचन करण्यात आले.कथे दरम्यान कीर्तन सप्ताहात दररोज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे हरीकीर्तन पार पडले.तर यावेळी भाविकांसाठी दररोज महाप्रसाद अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते.भागवत कथा व कीर्तन सप्ताह हभप विठ्ठल महाराज साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हभप प्रमोद महाराज जोशी व गायनाचार्य हभप गजानन महाराज खोंड यांची विशेष उपस्थिती होती.सप्ताहाची सांगता हभप सोपान महाराज काळपांडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असुन दु.१ते ३ भव्य महाप्रसाद असणार आहे.अशी माहीती काकडा आरती मंडळाचे गजानन धर्मे यांनी दिली.