तंटामुक्त समिती लोनवाही यांच्या पुढाकाराने विवाह संपन्न

0
983
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- लोनवाही येथील गोविंदा मेश्राम यांची मुलगी मंगला गोविंदा मेश्राम व कोमल मेश्राम ता. सिंदेवाही यांची विवाह महात्मा गाँधी तंटामुक्त समिती लोनवाही यांच्या पुढाकराने संपन्न झाला.

सविस्तर वृत्त असे की लोनवाही गोंविंदा मेश्राम रा. लोनवाही हे अत्यंत गरीब असुन असल्यामुळे त्यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला की मुलीचा लग्न कसा करायचा याची माहिती  महात्मा गाँधी तंटामुक्त समिती लोनवाही चे सदस्य तथा ग्राम पंचायत लोनवाही चे उपसरपंच यांना मिळताच त्यांनी पुढाकार घेउन सिंदेवाही येथील मुलगा कोमल मेश्राम यांच्या वडिलासोबत चर्चा करुन महात्मा गाँधी तंटामुक्त समिती लोनवाही अंतर्गत विवाह करण्यात मुलाच्या वाडीलाला प्रोत्साहित केला. मुलाच्या वाडीलाने सुद्धा मुलीकडील आर्थिक परीस्थीती पाहता या विवाह सोहळयाला आपला होकार दर्शिविला व महात्मा गाँधी तंटामुक्त समिती लोनवाही यांच्या पुढाकाराने ग्राम पंचायत कार्यालय लोनवाही येथे विवाह लावण्यात आला. त्यांनतर लोनवाही ग्राम वसियांच्या पुढाकाराने मुला-मुलीला (नवरा-नवरी) ला नवीन कपडे व पाहुनेमंडळींना जेवण दिले.

यावेळी अनिल जनबंधु त. मु. अध्यक्ष, राजू शेख त. मु. सदस्य, मनोहर पावर त. मु. सदस्य, पुष्पा पवार त. मु. सदस्य, नोमान पठान ग्रा.प. सदस्य, रवी सावकुळे, पुष्पा चामटकर, नलिनी उंदीरवाडे, संगीता रामटेके, रवी दिघोरे, रश्मी दिघोरे पोलिस पा. लोनवाही, निलकंठ ठाकरे व लोनवाही येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.